Author: breakingvidarbha

जिल्हा परिषदेच्या औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत औषध रेकॉर्ड मध्ये आढळली तफावत वर्धा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या औषध भांडाराचे मुख्य औषध निर्माण अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले असल्याची घटना वर्धा जिल्हा परिषदेत घडली आहे. 5 मार्च रोजी सायंकाळी ही तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. औषध निर्माण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसचे समाधानकारक उत्तर देऊ शकले नसल्याने हे निलंबन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाने जिल्हा परिषदेत खळबळ निर्माण झाली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये या निलंबनाची चर्चा होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी…

Read More

लद्दाखच्या लोकसंघर्षावर साधला संवाद वर्धा : जनता अल्लादिन झाली आहे, ती जादुई चिराग घासते आणि दिव्यातला जीन ‘क्या हुक्म मेरे आका’ म्हणत नको असलेल्या गोष्टींची पूर्तता करीत राहतो. सरकारला दोष देण्यात अर्थ नाही. लोकांनी आपल्या अनाठायी मागण्या थांबवल्या तरच निसर्गाचे शोषण थांबेल, असे प्रतिपादन प्रयोगशील शिक्षक व पर्यावरणतज्ञ सोनम वांगचुक यांनी वर्धेकरांशी संवाद साधताना केले. भारतीय लोकशाही अभियानाद्वारे बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रांथालयाच्या सभागृहात ‘लोकलढा लद्दाखचा’ या विषयावर वांगचुक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मी झोपलेल्या गोंडस कुंभकर्णांना जागे करण्यासाठी देशभर फिरतो आहे, अशी हलकीफुलकी सुरुवात करीत सोनम वांगचुक यांनी या व्याख्यानात देशासमोरील वर्तमानकालीन पर्यावरणीय समस्या मांडतानाच वातावरण बदलाच्या दुष्परिणामांची…

Read More

 युथ फेस्ट २०२५ ला वर्धेतील सुमारे २५००० युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  तीन दिवसीय कार्यक्रमात १३ विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन वर्धेबरोबरच संपूर्ण विदर्भातील युवकांचा कार्यक्रमात सहभाग २०० युवकांच्या रहिवासी शिबीरचे आयोजन वर्धा : युवकांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता तसेच त्यांच्यातील एक चांगला कलाकार वक्ता तसेच अभ्यासू व्यक्तिमत्व समाजासमोर आणण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांना त्यांच्या हक्काचा मंच मिळवून देण्याकरिता वर्धा येथे युथ फेस्ट २०२५ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून तसेच वर्धा जिल्ह्यातून सुमारे २५००० युवकांनी घेतला.  या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ९,१०,११,१२, जानेवारी ला वर्धेतील चरखा गृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यमंत्री डॉ पंकज भोयर व देवळी…

Read More

समीर देशमुख यांचे वक्तव्य यशवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिराचे उद्घाटन वर्धा : राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर हे सातत्याने ग्रामीण भागातच घेतले जातात. ग्रामीण जीवनाचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, येथील दैनंदिनी व्यवहार राहणीमान त्यांचे सुख दुःख, सामाजिक एकात्मता या सामाजिक संबंधाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम या सर्व गोष्टीचा परिचय होण्यासाठी हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असते. असे मत  समीरभाऊ देशमुख, अध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा यांनी व्यक्त केले. ते यशवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून सालोड (हिरापूर) येथे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेश असमवार,…

Read More

नझूल जमीन निवासी प्रयोजनार्थ फ्रि-होल्ड करण्याकरीता विशेष शिबिर आयोजित उपविभागीय अधिकारी कार्यालयात दर मंगळवार व गुरुवारला होणार शिबिर वर्धा :  नागपूर विभागातील नझूल जमीन फ्रि – होल्ड (भोगवटदार वर्ग 1 ) करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असुन विशेष अभय योजना सुरू केली आहे. या विशेष अभय योजनेमध्ये नझूल जमीन फ्रि – होल्ड (भोगवटदार वर्ग 1) करण्याकरीता तसेच नुतणीकरण करण्याकरीता संबंधित उपविभागीय अधिकारी तथा नझूल अधिकारी यांचेकडे आवश्यक सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. या योजनेअंतर्गत सर्व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात दर मंगळवार व गुरुवारला विशेष शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले…

Read More

सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय – पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना मुंबई  :  राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास दिनांक ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली. पणन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. विभागाचे कामकाज गतीने करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीस पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, उपसचिव संतोष देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पणन मंत्री रावल म्हणाले की, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता…

Read More

जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई  : जल जीवन मिशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक दिसावा यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर करून ही योजना संपूर्ण सोलारायझेशनवर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलजीवन मिशन योजनेतून घेण्यात येणाऱ्या योजनांचे सोलारायजेशन झाल्यास वीज बरोबरच वीज बिलात बचत होईल. यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एक सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. नल जल मित्र या योजनेसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतून या तरुणांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही…

Read More

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 च्या प्रकल्पास अधिक गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशीप कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून काम करत असतांना प्रकल्प विकासकांना ज्या ठिकाणी अडीअडचणी येत असतील, तर संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा बैठक घेऊन घेऊन त्या समस्या सोडवाव्यात. यासंदर्भातील अहवाल पुढील 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राबवितांना प्रकल्प विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नसल्याचे  नमुद करून मुख्यमंत्री म्हणाले की, जमीन अतिक्रमीत झालेल्या ठिकाणी प्रकल्प विकासक तसेच जिल्हाधिकारी,…

Read More

पदभार स्वीकारताचा कामाला सुरुवात वर्धा : शासनाने नुकतेच आदेश निर्गमित करुन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिक येथे आयुक्तपदी बदली केली असून त्यांच्या जागेवर राज्याच्या राज्य कर विभागाच्या सहआयुक्त वान्मथी सी. यांची जिल्हाधिकारी वर्धा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी 10.30 वाजता नवनियुक्त जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. तामिळनाडू येथील इरोड जिल्ह्यातील त्या मूळ रहिवासी आहेत. वान्मथी सी. या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2015 च्या बॅचच्या असून त्यांनी 152 वी रँक प्राप्त केली होती. आयएएस रँक मिळाल्यानंतर त्यांनी यापुर्वी नंदूरबार येथे 2018-2019 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणुन सेवा दिली. जुलै 2019 ते 2022 या कार्यकाळात त्यांनी धुळे जिल्हा…

Read More

श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशनचा उपक्रम ८ फेब्रुवारी रोजी होणार मेळावा वर्धाः वर्धा येथे श्री. संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा द्वारा आयोजित पाचवा तेली समाज सर्वशाखीय राज्य स्तरीय उपवधू-वर पालक परीचय मेळावा शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ ला ला सकाळी ११ वाजता  मुडे सेलिब्रेशन हॉल रिंग रोड, जुनापाणी चौक, वर्धा येथे संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा  खासदार रामदास तडस व समाजातील  इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित असणार आहे.  या तेली समाज सर्व शाखेतील उपवधु-वर व पालक परिचय मेळावा व ‘‘स्नेहीबंध’’ परिचयपत्र पुस्तीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व समाज बांधवाच्या उपस्थितीत होणार आहे. यासदर ‘‘स्नेहीबंध’’ परिचयपत्र…

Read More