काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
वर्धा : काँग्रेसचे माजी आमदार आर्वी येथील अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश झाला आहे. आज सायंकाळी झालेल्या बैठकीत हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, अनिल देशमुख हे उपस्थित होते.
शरद पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या हस्ते दुपट्टा खांद्यावर घालत प्रवेश करण्यात आला. तुतारीच्या चिन्हावर माजी आमदार अमर काळे वर्धा लोकसभेच्या जागेवर लढणार आहे. 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत यांनी दिली आहे. सिल्व्हर ओक येथे पक्ष प्रवेश कार्यक्रमात वर्ध्यातील स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस नेते उपस्थित होते. यात अतुल वंदिले राजू तिमांडे, सुधीर कोठारी, नितेश कराळे उपस्थित होते.