आरोपी आफताबनं गर्लफ्रेंड श्रद्धाची हत्या केल्याची कबुली तर दिली आहे. मात्र, तोच खुनी असल्याचं सिद्ध करणं, हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. यासाठी काही व्यक्ती पोलिसांना मदत करू शकता
- LAST UPDATED :
- DELHI, INDIA
नवी दिल्ली 18 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एक भयानक हत्याकांड उघडकीस आलं आहे. आफताब पूनावाला नावाच्या व्यक्तीनं आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याची भयानक घटना समोर आली आहे. श्रद्धाच्या हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची कसून चौकशी सुरू आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबनं तिच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. पोलीस मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी जंगलात फिरत आहेत. आत्तापर्यंत मृतदेहाचे 13 तुकडे सापडले आहेत. मात्र, अजूनही अत्यंत महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
पोलिसांना श्रद्धाचं डोकं आणि मोबाईल सापडलेला नाही. याशिवाय, ज्या शस्त्रानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले तेही अद्याप सापडलेलं नाही. आरोपी आफताबनं गर्लफ्रेंड श्रद्धाची हत्या केल्याची कबुली तर दिली आहे. मात्र, तोच खुनी असल्याचं सिद्ध करणं, हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. या साठी काही व्यक्ती पोलिसांना मदत करू शकतात. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
आफताब वारंवार आपला जबाब बदलत असून, तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्जही केला आहे. या दरम्यान, अशा काही व्यक्ती आहेत ज्यांची साक्ष आफताबला गुन्हेगार सिद्ध करू शकते. पोलीस या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात विसंबून राहू शकतात.


