Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, June 3
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
अपडेट

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

breakingvidarbhaBy breakingvidarbhaMay 11, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या सूचना 

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पुर्व आढावा बैठक

वर्धा : खरीप हंगामाला सुरवात होत असून शेतकरी हंगामासाठी पिक कर्ज घेत असतो. पिक कर्जासाठी बँक शाखेत अर्ज केल्यावर सदर अर्ज मुख्य शाखेत मंजुरीसाठी पाठविण्यात येत असल्यामुळे कर्ज प्रकरणे मंजूर होण्यास बराच वेळ जातो. परिणामी पेरणीला सुरवात होऊन जाते. यासाठी बँकांनी समन्वयाची भूमिका बजावून पिककर्जाची प्रकरणे तात्काळ मंजूर करावी. पिक कर्जाचे 100 टक्के वितरण करावे, अशा सूचना पालकमंत्री पंकज भोयर यांनी केल्यात.

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पुर्व आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सुचना केल्या. बैठकीला खासदार अमर काळे, आ. दादाराव केचे, आ. समिर कुणावार, आ. राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर आदी उपस्थित होते.

मागील वर्षी 887 कोटी 48 लाख रुपयांचे पिककर्जाचे वाटप करण्यात आले. यावर्षी देण्यात आलेले पिककर्जाचे 100 टक्के लक्षांक पूर्ण होईल, असे बँकांनी नियोजन करावे. प्रधानमंत्री सौर कृषि पंप योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या सौरपंपामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने जिल्हा व तालुका तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा. पुर्वी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत केवळ शेतकऱ्यांना मदत देण्यात येत होती. शासनाने यामध्ये बदल करुन शेतमजूरांचा समावेश केला आहे. याची ग्रामीण भागात कृषि विभागांनी जनजागृती करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत निधीपासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिल्यात.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारण, जलयुक्त शिवारमधील कामांचे प्राधान्य ठरवून ती पूर्ण करण्यात यावीत. तसेच शेतक-यावर दुपारी पेरणीचे संकट येऊ नये यासाठी गावस्तरावर बैठका घेऊन शेतीचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशाही सुचना यावेळी पालकमंत्री  भोयर यांनी दिल्यात.

यावर्षी जिल्ह्यात धान, ज्वारी, बाजरी, मका, तुर, मुग, उडीद, सोयाबीन, तीळ, सुर्यफुल, भुईमुग, कापूस या पिकासाठी 4 लाख 18 हजार 975 हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून 87 हजार 184 क्विंटल बियाणे मागणीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 1 लाख 17 हजार 100 मेट्रीक टन खताची मागणी असून एप्रिल अखेर पर्यंत 59 हजार 189 मेट्रीक टन खताचा साठा शिल्लक आहे, असे अरविंद उपरीकर यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी खासदार अमर काळे यांनी खत वितरीत करण्यासाठी वर्धा व हिंगणघाट रॅक पॉईट असल्याने काही तालुक्यात खत पुरवठ्याला विलंब होत असतो, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. आ. दादाराव केचे यांनी बोगस बियाणे विक्री करण्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे. पीएम किसान निधी पासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले तर आ. समिर कुणावार यांनी शेतक-यांना माती परीक्षण यावर मार्गदर्शन करण्यासाठी तालुका स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करावे, असे ते म्हणाले.

आ.राजेश बकाने यांनी एलनिनोच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनील जागृक राहून तसे नियोजन करण्याच्या सुचना दिल्यात. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी, कृषि निविष्ठा दुकानदार संघटनेची प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण शेती करणा-या शेतक-यांचा व शेतक-यांना सहकार्य करणा-या अधिका-यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

breakingvidarbha

Post Views: 30
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

By breakingvidarbhaMay 13, 20260

 वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजाती वर्धा : 9 मे या दिवशी असलेल्या ग्लोबल बिग डे…

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025
Demo
Top Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (961)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (953)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (824)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (786)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (738)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.