Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, July 29
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज?
अपडेट

अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज?

उमेदवारी अर्ज भरताना होणार शक्तिप्रदर्शन
breakingvidarbhaBy breakingvidarbhaMarch 29, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दोन एप्रिल रोजी अमर काळे भरणार उमेदवारी अर्ज

का निवडली दोन एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख?

वर्धा : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. ही म्हण सर्वच मानव प्राण्याला लागू आहे. देशात आईचा आशीर्वाद घेत येत्या लोकशाहीच्या उत्सवात अनेक उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. आईचा आशीर्वाद घेत अमर काळे हे देखील उमेदवारी अर्ज भरू शकतात… त्यासाठीच दोन एप्रिल ही तारीख त्यांच्यासाठी योग्य मानली जात आहे.
आर्वी येथील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी मिळणार ही शक्यता केवळ शक्यताच आजवर राहिली होती. अमर काळे यांनी लोकसभा लढविण्याचे संकेत दिले होते. पण इच्छुकांच्या नाराज्या आणि अधांतरी असलेले उमेदवारीचे आश्वासन या बाबी अस्वस्थ करणाऱ्या होत्या. पण आता अमर काळे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) प्रवेशानंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. समाज माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छाचा देखील वर्षाव झाला आहे. माजी आमदार अमर काळे मूळचे आर्वी येथील आहेत. वडील शरद काळे हे सलग चारदा विधानसभेत निवडून गेले. 1985 मध्ये श्रीधरराव ठाकरे यांचा पराभव करीत 44 टक्के मते घेत विजय मिळविला होता. 1990 मध्ये ज्योती विजय खोंडे यांच्या विरोधात 36 टक्के मतदान घेत विजयी झाले होते. 1995 मध्ये दिलीप नारायणराव काळे यांच्या विरुद्ध 39 टक्के मतदान त्यांनी मिळविले. तर 1999 मध्ये विजयराव मुळे यांच्या विरुद्ध शरद काळे 40 टक्के मताधिक्य घेत विजयी झाले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांना जेवढी कार्यकर्त्यांची साथ मिळाली तेवढीच साथ त्यांच्या पत्नी म्हणजेच माजी आमदार अमर काळे यांच्या आई अनुराधा ताई शरदराव काळे यांची साथ मिळाली. राजकारणात पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अनुराधा ताई यांनी सतत शरदराव काळे यांना साथ दिली. अमर काळे यांना राजकीय वारसा घरून मिळाला पण तेवढाच त्यांनी तो टिकवून ठेवण्यासाठी धडपड देखील केली असे त्यांचे जुने सहकारी सांगतात.
दूर होताहेत नाराज्या : 
उमेदवारी मिळविण्यात जवळपास यश आले आहे. आपल्या उमेदवारीला विरोध दर्शविणाऱ्यांच्या नाराज्या दूर करण्यात देखील त्यांना यश आले असल्याचे चित्र सध्या सिल्व्हर ओक वरील छायाचित्रातून स्पष्ट होत आहे. अमर काळे यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात सुनील राऊत, नितेश कराळे, माजी आमदार राजू तिमांडे, सुधीर कोठारी, अतुल वादीले, सुरेश देशमुख हे स्थानिक नेते उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीने कंबर कसली असल्याचे चित्र आहे.
सिल्व्हर ओकवर पक्ष प्रवेश

 

दोन एप्रिल खास दिवस : 
2 एप्रिल हा अमर काळे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडलेला दिवस. अमर काळे यांनी हाच दिवस का निवडला? याचे उत्तर मात्र काळे यांच्या कार्यकर्त्यांच्या ओठी चांगलेच बसले आहे. 2 एप्रिल हा दिवस म्हणजे अमर काळे याच्या आई अनुराधाताई शरदराव काळे यांचा स्मृती दिवस. आईच्या स्मृती दिवसावर उमेदवारी अर्ज भरण्याचा योग येणे म्हणजे आईचा आशीर्वादच मिळविणे, असे अमर काळे समजतात. त्यामुळे अमर काळे यांनी या दिवसावर आपली उमेदवारी भरण्याची तयारी चालविली आहे.

दोन एप्रिल रोजी आपण उमेदवारी दाखल करणार असल्याचे अमर काळे यांनी।आधीच स्पष्ट केले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस चे वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी देखील दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले आहे.

breakingvidarbha

Post Views: 832
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (998)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (982)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (874)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (832)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (778)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.