‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे यांची संवाद सभा
सामाजिक सांस्कृतिक संस्थांचा सहभाग
वर्धा : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे शासनाचे आणि समाजाचे लक्ष वेधणारा ‘तेरवं’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून वैदर्भीय पार्श्वभूमी लाभलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश इथापे यांची संवाद सभा शुक्रवार, दि. १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.



