Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, June 3
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » वर्ध्यात हद्द..पार कोण?
अपडेट

वर्ध्यात हद्द..पार कोण?

breakingvidarbhaBy breakingvidarbhaJune 6, 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शरद पवार यांची ही पहिली रॅलीच ठरली विजयाची रॅली 

वर्धा: शरद पवार यांच्या कुस्तीगीर परिषदेतील अध्यक्ष पदाला आव्हान दिले गेले. राजकारणाच्या कुस्तीतल्या या पैलवाणाची खेळी कुस्तीच्या फळात हुकली पण राजकारणाच्या फळात हुकणार तरी कशी, त्यामुळेच की काय परिषदेत आपल्याला धूळ चारणाऱ्या पहिलवाणाला चित करण्याचा आखलेला डाव वर्ध्यात रामदास तडस यांच्या पराभवाने देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडत शरद पवार यांनी फडणवीसांना मात दिली आहे. वर्ध्यातून काँग्रेस हद्दपार केली,अशी टीका शरद पवार यांच्यावर झाली, पण अमर काळे यांच्या विजयानंतर नेमके हद्दपार कोण झाले? असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विचारू लागले आहे.
वर्धा लोकसभेची उमेदवारी काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेसला? या संघर्षातून गेलेली लढाई अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांना विजयी करून गेली. काँग्रेसच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी आणण्यात सुनील केदार आणि अनिल देशमुख या दोन मोठ्या नेत्यांना यश आले.  या दोन्ही नागपूरच्या नेत्यांनी प्रचाराची बाजू सांभाळली. आघडीचे उमेदवार म्हणून आर्वीचे  काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे  हे नाव जाहीर होताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. दुसरीकडे भाजपमध्ये अमर काळे यांच्या विरुद्ध लढण्यासाठी रामदास तडस यांच्या शिवाय दुसरा उमेदवार आवश्यक असल्याची कुजबुज सुरू झाली, पण आधीच भाजपने उमेदवार घोषित केल्याने वरिष्ठ नेतृत्वाला रामदास तडस यांच्यावरच डाव लावणे अत्यावश्यक झाले.
निकालानंतर भाजपने लावलेला डाव मात्र फसला, अशा चर्चा आता भाजपच्या गोटात सुरू झाल्या आहे.  अमर काळे 81 हजार 162 मतांनी विजयी झाले. अमर काळे  यांना 5 लाख 30 हजार 761 मते मिळाली. तर रामदास तडस  यांना 4 लाख 49 हजार 599 मते मिळाली आहे.
मिळालेले मताधिक्य देवळी पुलगाव आणि हिंगणघाट मतदार संघातून जास्त प्रमाणात आले आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात अतुल  वांदिले यांनी आपले कार्यकर्ते कामाला लावले, हिंगणघाटच्या विविध सभांचाही परिणाम समोर आला. 
वर्ध्यात अमर काळे यांची उमेदवारी जाहीर होताच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार स्वतः येणार असल्याचा म्यासेज फिरल्याने  या निवडणुकीचे चित्र फारच रोचक झाले. वर्धा शहरातील वंजारी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा तीन किमी अंतराच्या नामांकन अर्ज भरण्याच्या रॅलीत चार तास शरद पवार स्वतः अनेकदा नागरिकांना अभिवादन करीत होते, पहिल्याच दिवशीचे हे चित्र गावखेड्यात पोहचले, याची चर्चाही भरपूर झाली. शरद पवार यांची ही पहिली रॅलीच विजयाची रॅली ठरली. कित्येक वर्ष कुस्तीत घालवलेल्या शरद पवार यांची कुस्तीगीर परिषद देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकून ताब्यात घेतली. कुस्तीपटू असलेल्या खासदार रामदास तडस यांना कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बनविले, कुस्तीगीर परिषद भाजपकडे गेली. तेव्हापासूनच एकेकाळी शरद पवार यांचा खंदा पुरस्कर्ता म्हणून ओळखले जाणारे रामदास तडस आणि शरद पवार यांच्यातील वैचारिक वार वाढत गेले. एकेकाळी गुरु – शिष्य असणाऱ्या पवार – तडस यांच्यात यावेळी निवडणूक संघर्ष सुरू झाला. लकसभा निवडणूक शरद पवार यांनी मनावर घेतली. त्याचा परिणाम आता निवडणुकीत उमटला.
भाजपकडून बूथ नियोजन काटेकोर करण्यात आले असल्याचा आत्मविश्वास भाजप पदाधीकाऱ्यांमध्ये होता, ऐनवेळी सुधीर दिवे, सुमित वानखेडे ही नावे निवडणूक म्यानेजमेंट तज्ञ म्हणून चर्चेत राहिली. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. केवळ बूथ मजबूत करून होत नाही, ग्राउंडवर रूट लेव्हलला कामे पोहचवावी लागतात, हाच धडा या निवडणुकीत भाजपला मिळाला आहे.
वर्धा विधानसभा मतदार संघात 7 हजाराने तडस मागे आहे,देवळी मतदार संघात 40 हजाराने मागे आहे,हिंगणघाट येथे 15  हजार मताने मागे आहे,धामणगाव मतदार संघात 17 हजार मताने मागे आहे,आर्वी मतदार संघात 14 हजार मताने पिछाडले आहे तर मोर्शी या विधानसभा क्षेत्रात तडस यांनी 12 हजाराचे मताधिक्य घेतले आहे.
मताधिक्याच्या या गोळाबेरजेत भाजप आमदारांच्या काम करण्याच्या शैलीवर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे.
ग्रामीण मधून आघाडीची मुसंडी
शेतकरी, शेतमजूर, कामगार हा वर्ग ग्रामीण भागात राहतो. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव हा मुद्दा या निवडणुकीत सर्वात जास्त गाजला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कपाशीला भाव मिळाला नाही. या मुद्द्याकडे महाविकास आघाडीने प्रचारात सर्वाधिक जोर दिला. अमर काळे यांनी सर्वच प्रचार सभेत एकच प्रश्न जनतेला विचारला आणि तो प्रश्न होता… गेल्या दहा वर्षात खासदार रामदास तडस यांनी केलेले एकतरी काम दाखवा जे जनतेच्या लक्षात राहू शकेल? या प्रश्नाची मतदारांमध्ये चर्चा होती.
बंड शमविण्यात भाजपचा वेळ गेला
माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी तडस यांना माध्यमांसमोर निष्क्रिय म्हणत बंड केले, तर दुसरीकडे वरुड येथे देखील बंड पाहायला मिळाले. बंड शमविताना भाजपला बराच वेळ लागला. भाजपच्या गोटात मात्र या बंडामुळे लागलेली धग कायम राहिली.
breakingvidarbha

Post Views: 739
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

By breakingvidarbhaMay 13, 20260

 वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजाती वर्धा : 9 मे या दिवशी असलेल्या ग्लोबल बिग डे…

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025
Demo
Top Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (961)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (953)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (824)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (786)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (739)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.