वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजाती
वर्धा : 9 मे या दिवशी असलेल्या ग्लोबल बिग डे या जाग
तिक पक्षी गणनेच्या निमित्याने वर्धा जिल्ह्यातील येळाकेळी, जामणी, पिपरी तसेच वर्धा शहर परिसरातील विविध अधिवासात केलेल्या पक्षी निरीक्षणात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी घेवून त्या ई-बर्डच्या संकेतस्थळावर नोंदवण्यात आल्या. यात प्रामुख्याने वर्धा जिल्ह्याकरिता ई-बर्डनुसार दुर्मिळ असलेल्या बलाकचोच धीवर (स्टॉर्क-बिल्ड किंगफिशर) याची नोंद झाली. यात महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या नागपूर विभागाचे विदर्भ समन्वयक राहुल वकारे यांनी सहभाग घेतला होता.
तिक पक्षी गणनेच्या निमित्याने वर्धा जिल्ह्यातील येळाकेळी, जामणी, पिपरी तसेच वर्धा शहर परिसरातील विविध अधिवासात केलेल्या पक्षी निरीक्षणात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी घेवून त्या ई-बर्डच्या संकेतस्थळावर नोंदवण्यात आल्या. यात प्रामुख्याने वर्धा जिल्ह्याकरिता ई-बर्डनुसार दुर्मिळ असलेल्या बलाकचोच धीवर (स्टॉर्क-बिल्ड किंगफिशर) याची नोंद झाली. यात महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या नागपूर विभागाचे विदर्भ समन्वयक राहुल वकारे यांनी सहभाग घेतला होता.वर्धेत नोंदवण्यात आलेल्या पक्षी प्रजातींमध्ये जागतिक आययुसीएन या संघटनेद्वारे वर्गीकरण करण्यात आल्यानुसार असुरक्षित वर्गात मोडणारे नदी सुरय (रीवर टर्न), छोटा आर्ली (स्मॉल प्रटीनकोल), पेरते व्हा म्हणून आवाज देणारा पावश्या (कॉमन हॉक कुकू) तसेच हिवाळी स्थलांतरित छोटा कंठेरी चिखल्या (लिटील रिंग प्लोवर), लाल पुठ्ठ्याची भिंगरी (इस्टर्न रेड-रुम्पड श्वालो), रेषाळ कंठाची भिंगरी (स्ट्रीक-थ्रोटेड श्वालो) आढळले. राखी बगळा (ग्रे हेरॉन), हळदीकुंकू बदक (इंडिअन स्पॉट-बिल्ड डक) आणि काळा शराटी (ब्लॅक हेडेड आयबीस) या पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
ग्रामीण भागातील तलावांवर मोठ्या प्रमाणात मुरूम व रेतीचे उत्खनन जेसीबीच्या सहाय्याने सुरु आहे. सध्या जमिनीवर घरटे करणाऱ्या पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असून त्याकरीता त्यांना सुरुक्षित तलावाकाठील मोकळी सपाट जागेची आवश्यकता आहे. उत्खननामुळे त्यांच्या प्रजननावर संकट आले आहे. तरी प्रशासनानी याबाबी लक्षात घेवून उत्खनन करावे. आनंदाची बातमी म्हणजे जामणी जवळील तलावा मधील बेटावर नदी सुरय (रीवर टर्न) यांचे मोठ्या प्रमाणात यशस्वी प्रजनन झाले.


