हिंगणघाटच्या तुकडोजी वॉर्ड परिसरात कारवाई
वर्धा : हिंगणघाट शहरातील मुख्य वस्तीत एका व्यक्तीच्या घरात 532 ग्रॅम गांजा आढळून आला. हिंगणघाट पोलिसांनी छापा टाकून गांजा जप्त केला आहे तर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने संत चोखोबा वार्ड हिंगणघाट येथील टाका ग्राउंड जवळ राहणारा शेख युसुफ शेख करीम वय 58 वर्ष याचे घरी गांजा च्या माहितीवरून रेड केला. दरम्यान आरोपीच्या घराच्या घरझडती मध्ये अंदाजे क 15,960 रूपये किंमतीचा ओलसर गांजा 532 ग्रॅम या सापडला.सदर गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. सदरचा गांजा मौका जप्त पंचनामा कारवाई प्रामणे जप्त करून आरोपीविरूध्द एन डी पी एस कायदयान्वे गुन्हा नेांद करून तपासात घेतला.


