वर्धा : स्वातंत्र्योत्तर काळात समाजात अनेक अमुलाग्र बदल झाले असून समाज सुधारकांसोबतच सामाजिक चळवळींनी निर्माण केलेल्या कार्याचे ते फलीत होय, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी स्थानिक कुमारप्पा येथे आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत केले.
अभाअंनिसच्या स्थापनेला ४० वर्षे पूर्ण झाली असून चार दशकांचा आढावा घेण्यासोबतच आगामी धोरणांबाबत दिशा निश्चित करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत श्याम मानव यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत विविध उपक्रमांंच्या नियोजनाबाबत चर्चा केली. यावेळी अंनिसचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, युवा शाखा राज्य संघटक पंकज वंजारे, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, जिल्हा महिला संघटिका प्रा. डाॅ. सुचिता राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील कार्यक्रम, गावपातळीवर जाहीर सभा, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा प्रचार व प्रसार, चाळीस वर्षांच्या वाटचालीची मांडणी करणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन, ऑनलाईन अंकाची तयारी, अंधश्रद्धा निर्मूलन कथामाला, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारा अभ्यासक्रम व परीक्षांचे नियोजन आदी विविधांगी उपक्रम राबविण्याबाबत समित्यांचे गठण करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
प्रारंभी जिल्हा शाखेचा वार्षिक कार्य अहवाल प्रास्तविकातून वर्धा जिल्हा सचिव निलेश गुल्हाने यांनी सभेपुढे सादर केला. सभेचे संचालन पंकज वंजारे यांनी केले. तर आभार आशिष मोडक यांनी मानले.
सभेला प्रा. किशोर वानखेडे, अॅड. के.पी. लोहवे, रवींद्र पुनसे, प्रा. एकनाथ मुरकुटे, पी. के. खोबे, अजय इंगोले, मुकेश लुतडे, सुनंदा वानखेडे, संगीता इंगळे, किरण पट्टेवार, जीवन चोरे, सुमित उगेमुगे, अथर्व भिंगारे, मनिष पुसाटे, निलेश बोबडे, अजय गुप्ता, विलास गोतमारे, सेजल फेंडर, मनोज गायधने, दिनेश कोकाटे, डाॅ. अन्वर सिद्दीकी, अनुप अहीर, डॉ. किरण शेंद्रे, डॉ. कांचन जांभूळकर, श्रीपाल मारवाडे, देवर्षी बोबडे, सान्वी वंजारे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाखांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
Breaking News
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
- शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
- जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती


