Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
  • जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Thursday, April 16
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » तपकिरी रंगांच्या दोन पिल्लांसह अस्वलाची आगेकूच
पर्यावरण

तपकिरी रंगांच्या दोन पिल्लांसह अस्वलाची आगेकूच

बोर मध्ये आढळून आलेय दुर्मिळ अस्वलाचे कुटुंब
breakingvidarbhaBy breakingvidarbhaDecember 20, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वर्धा : जैवविविधतेने संपन्न असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात दुस-यांदा अस्वलांचे दोन दुर्मिळ ल्युसिस्टिक शावक त्यांच्या आईसोबत वनभ्रमंती करतांना आढळुन आले आहेत.
वनरक्षक मोटार सायकलने कळमेट चेकपोस्ट कडे जात असतांना आमगाव चेकपोस्ट पासुन जवळपास २ किमी अंतरावर अचानकपणे एक काळ्या रंगाची अस्वल वनक्षेत्रातुन निघून डांबर रस्त्यावर येतांना दिसून आली. पाठोपाठ तपकिरी रंगाचे अंदाजे १ वर्ष वयाचे अस्वलीचे पिल्लू (शावक) रोडवर आले. लगेच पुन्हा एक तपकिरी रंगाचेच शावक रस्त्यावर येवुन आईचे पाठीमागे धावू लागले. काळ्या रंगाचे मादी अस्वल व तपकिरी रंगाचे दोन शावक दृष्टीस पडले आहे. यापूर्वी देखील सदर परिसरातच अडीच वर्ष वयाचे एक तपकिरी रंगाचे ल्युसिस्टीक स्लॉथ बिअर प्रथमत: आढळून आले होते.

http://breakingvidarbha.com/wp-content/uploads/2022/12/VID-20221220-WA0059.mp4

तपकिरी रंगाचे “ल्युसिस्टीक” शावकांबरोबर आढळुन आलेल्या काळ्या रंगाच्या मादी अस्वलीनेच डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० मध्ये १ तपकिरी रंगाचे ल्युसिस्टीक शावक व इतर १ काळ्या रंगाचे शावकास जन्म दिले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात आढळणा-या उर्सिडे कुळातील अस्वल (शास्त्रीय नाव- मेलियुरसस उर्सिनस) यांचा समागमकाळ उन्हाळ्यात असतो, मादी माजावर असतांना अनेक नर तिच्या पाठी मागे असतात, त्यापैकी एका नरासोबत मादीचे मिलन होवुन गर्भधारणा होते. अस्वलीचे गर्भधारणेचा कालावधी ७ ते ९ महिन्याचा असतो. त्यामुळे सरासरी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात शावक जन्माला येतात. अस्वल सरासरी १ ते २ पिल्लांना जन्माला घालते. शावकांचा जन्म झाल्यानंतर त्यांचे प्रथमत: वजन फक्त २५० ग्राम पर्यंतच असते आणि त्यांचे डोळे बंद असतात, त्यामुळेच जवळपास ३ महिन्याचे पिल्लू होईपर्यंत मादी अस्वल तीच्या शावकांना गुहेबाहेर काढत नाही. तीन महिने वयाचे शावक झाल्यावरच शावक त्यांचे आईच्या पाठीवर बसुन बाहेर फिरतांना आढळुन येतात. शावक ६ ते ७ महिन्याचे झाल्यानंतर आईच्या पाठीवर न बसता आईचे पाठीमागे चालायला लागते. शावक दोन ते अडीच ते वर्षाचे होईपर्यंत आई त्यांना सोबत ठेवते आणि त्यानंतर पिल्लांना स्वत:पासुन दूर ठेवते. अनेक वेळा गर्भधारणेनंतर नविन पिल्लांना जन्म देण्याचे १ ते २ महिने अगोदर पर्यंत जुन्या शावकांना सोबत ठेवुन त्यानंतर हाकलुन लावल्याचे मला मागील १० वर्षांपासुनच्या अस्वलीवरील अभ्यासपुर्ण निरिक्षणात आढळुन आलेले आहे. असे मत वनरक्षक सज्जन यांनी नोंदविले आहे.


रंगद्रव्यांच्या कमतरतेमुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील सदर मादी अस्वलीकडुन तपकिरी रंगाचे “ल्युसिस्टीक” या आजाराने ग्रस्त शावक जन्माला येत आहेत. ह्या आजारामुळे प्राण्यांचे फक्त अंगावरील केसांचा रंग बदलतो, त्यांच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. असे असले तरीही या “ल्युसिस्टिक” आजाराने ग्रस्त असलेल्या अस्वलींना जगण्यासाठी व ईतरांसोबत सहजिवन प्रस्तापित करण्यासाठी किती समस्यांना सामोरे जावे लागत असावे, यावर अभ्यासपुर्ण निरिक्षण करणे गरजेचे आहे.
अशी माहिती बोरधरण येथील वनरक्षक महेशकुमार सज्जन यांनी दिली आहे.

breakingvidarbha

Post Views: 112
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा

December 31, 2024

 सावंगी येथे आजपासून दोन दिवस बधिरीकरणशास्त्रावर परिषद

August 9, 2024

यशवंतच्या 125 गुणवंत विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षकांनी केले प्रोत्साहित

July 28, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

By breakingvidarbhaMarch 13, 20250

जिल्हा परिषदेच्या औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत औषध रेकॉर्ड मध्ये आढळली तफावत वर्धा :…

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!

January 14, 2025
Demo
Top Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (915)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (913)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (800)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (745)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (694)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.