अवकाळी पावसाचा तडाखा; संत्रा गहू हरभरा पिकाचे नुकसान
कारंजा तालुक्यात गारपीट व मुसळधार पाऊस
वर्धा : अवघ्या अर्धा ते पाऊण तास झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला. हातातोंडाशी आलेला घास अवघ्या काही तासात झालेंल्या अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतपिकांवरून शेतकरी स्वप्न रंगत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात शेतातील नुकसान बघता पाणी आल्याशिवाय राहत नाही. वर्धा जिल्ह्यातील आष्टी व कारंजा तालुक्यातील काही भागात गुरुवारी सायंकाळी विजेच्या कडकडाट,वादळी वाऱ्यासह ,गारपीट व मुसळधार पाऊस झाला.या पावसात हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.




मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. सोबतच आष्टी तालुक्यातील साहूर परिसरासह बेलोरा ,खंबरा,अंतोरा या शिवारात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.