समुद्रपूर येथे युवक काँग्रेसतर्फे शिवजयंती साजरी
कॉग्रेसमध्ये नवचेतना आणण्याचा होतोय प्रयत्न
वर्धा : आपल्या कृषिप्रधान देशातील बिघडत्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, नैतिक व राजकीय परिस्थितीची मूळ शेतीच्या तोट्यात गुंतून आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ ग्राम स्वराज्य आहे परंतु शेतीतील वाढत्या तोट्यामुळे ग्रामस्वराज्यच धोक्यात आले आहे. यावर पर्याय शोधण्यासाठी शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणांचा अभ्यास करणे व त्यांच्या आदर्शांवर देश चालविण्याची गरज आहे. येत्या पिढीला शिव चरित्र कळण्यासाठी व त्यांच्या मनावर महाराजांच्या अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यातील जीवन पद्धतीचा प्रभाव पडावा यासाठी त्यांच्यावर महाराजांच्या ऐतिहासिक यशोगाथा आणि जीवन चरित्र या उत्सवाच्या माध्यमातून बिंबवण्याचा उद्देश सर्वत्र आयोजकांनी अंगीकारणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी मांडले. समुद्रपूर येेेथेे शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. खुजे, प्रवीण उपासे, गुणवंत कोठेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.



