वर्धा (प्रतिनिधी) –  नागरीक व विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून “वॉक फॉर कॉन्स्टिट्युशन” संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून सहायक आयुक्त पी.जी. कुलकर्णी यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, समाज कल्याणचे विशेष अधिकारी अनिल वाळके, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिनेश बारई, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंदू पोपटकर, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. लोकेश नंदेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. मिलींद सवाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाचे मुख्याध्यापक रमेश अजमिरे, गृहपाल वाडेकर, सुजाता पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघून बडे चौक, सरदार वल्लभभाई पटेल चौक, मुख्य डाक घर रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय चौक आदी मार्गे निघून रॅलीचा समारोप सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले. सामाजिक न्याय भवन येथे विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाची पाहणी करून संविधान निर्मितीचा इतिहास जाणून घेतला.

रॅलीतील मार्गात सरदार वल्लभभाई पटेल, राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नागरीक व विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

breakingvidarbha

Share.
Leave A Reply