वर्धा : तहसील कार्यालय हिंगणघाट येथे संजय गांधी निराधार समितीची प्रथम बैठक आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर ही प्रथमच बैठक असल्याने याला विशेष महत्त्व आहे, यावेळी आमदार कुणावार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, समाजातील तळागाळातील सर्वसामान्य निराधार नागरीकांना योजनेचा लाभ मिळावा. या लाभापासून कुठलाही निराधार वंचित राहू नये यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. निराधार लाभार्थींच्या मानधनामध्ये दोनदा वाढ झाली असून दोन्हीदा ही वाढ उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीच केली हे विशेष या आहे.

या वेळी नवनियुक्त सदस्य गंगाधरराव कोल्हे, आकाश पोहाणे, शंकरराव मुंजेवार, शंकर मोरे, श्रीमती नलिनी सयाम,रजनी राईकवार, .निलेश किटकुले, सुरेश ढोकपांडे,यांची ओळख व सत्कार तहसीलदार हिंगणघाट व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला या बैठकीला माजी जिल्हा परिषद सभापती माधवराव चंदनखेडे,टिपूबाबू कोचर,भूषण पिसे, बंटी देशमुख,विठ्ठू बेनिवार, सुनील सरोदे श्री.सतीश मासाळ,अजय राऊत,ना.तहसीलदार, विजय पवार,ना.तहसीलदार, समशेर पठाण,ना.तहसीलदार, मारोती साठे आदी उपस्थित होते.


