आर्वी शहरात रॅली काढून करण्यात आले शक्ति प्रदर्शन
वर्धा : आर्वी मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने दादाराव केचे यांना उमेदवारी नाकारल्याने दादाराव केचे अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आर्वी शहरात रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.मोठ्या संख्येत नागरिक येथे सहभागी झाले. भाजपने केचे यांना उमेदवारी नाकारत सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली. दादाराव केचे यांच्या बंडखोरीमुळे आता आर्वी विधनसभेत नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.
आर्वी विधानसभा क्षेत्रात दादाराव केचे हे दोनदा भाजपच्या तिकिटावर निवडून आले. भाजपने यावेळी उमेदवार बदलविला आणि सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप आर्वी येथे दोन गटात विभागळ्याचे चित्र सध्या आर्वी येथे आहे. आज निघालेल्या नामांकन रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. जेसीपी ने पुष्पवृष्टी करीत येथे नामांकन दाखल करण्यात आले. भाजपात आर्वी येथील उमेदवारी नेमकी कुणाला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दादाराव केचे यांनी उमेदवारी दाखल करेपर्यंत आर्वी येथील उमेदवार घोषित करण्यात आला नव्हता. आज दुपारी मात्र येथे भाजपने उमेदवारी घोषित केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना येथे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मयुरा काळे रिंगणात आहे. दादाराव केचे भाजपचे आर्वीचे विद्यमान आमदार असून अर्ज कायम ठेवणार की बंडखोरी करणार यावर लक्ष लागले आहे.
Post Views: 225



