उबाठा गटाच्या नवनियुक्त संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत काही जणांनी दिले राजीनामे
वर्धा: वर्ध्याच्या देवळी येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समूहिक राजीनामे दिल्याने खळबळ उडालीय. नवनियुक्त संपर्क प्रमुखाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करीत हे राजीनामे देण्यात आले आहे. दिलेले राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मेलद्वारे पाठविले जाणार असल्याची पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. नवनियुक्त संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवरून अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठीच हे राजीनामानाट्य असल्याची चर्चा आहे.

