महात्मा गांधींच्या वेशभूषेत उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पोहचला आर्वीचा टिटू मोटवानी
अन खासदार बनून करणार मच्छरांचा नायनाट
शेतकऱ्यांच्या समस्यांसह बेरोजगारांच्या समस्यांकडे वेधले गांधींच्या वेशभूषेतल्या टीटूनी लक्ष
गांधींच्या वेषभूशेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचत घेतला उमेदवारी अर्ज
आर्वीच्या गांधी प्रकाश उर्फ टिटू मोटवानी याने वेधले सर्वांचे लक्ष
निवडून आल्यास तीन वर्षात करणार मच्छरांचा नायनाट
– उमेदवारी साठी नागरिकांकडून जुळवली राशी
वर्धा : सामान्य माणसांचे प्रश्न आणि वेगवेगळ्या समस्या निवडणूकीचे मुद्दे ठरतात. पण महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या वर्धा जिल्ह्यात गांधींच्या वेशभूषेत लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेण्यासाठी चक्क गांधींच्या वेषभुशेत आर्वीचा गांधी म्हणून ओळख असलेला प्रकाश उर्फ टिटू मोटवानी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर पोहचलाय. उमेदवारी अर्ज विकत घेण्यासाठी आलेल्या या प्रतीकात्मक गांधीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. लोकप्रतिनिधी अजूनही सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवू शकले नाही हेच या वेशभूषेतील प्रतिकात्मक गांधींने प्रतिक्रिया देत दाखवून दिले आहे. हा वेशभूषेत वावरणारा प्रतिकात्मक गांधी निवडून आल्यास एक वेगळी समस्या सोडवून देण्याचा दावा करतोय.. ती समस्या कोणती तर जिल्ह्यात असलेल्या मच्छरांचा नागरिकांना होणारा त्रास. याशिवाय शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या समस्या. 61 वर्षाच्या टीटूने तर मच्छरांना वर्ध्यातून हद्दपार करण्याचा विडाच उचलला आहेय. आज उमेदवारी अर्ज घेत दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच यांनी सांगितलंय.

प्रकाश उर्फ टिटू मोटवानी हे मूळचे वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथील राष्ट्रसंत वार्डाचे रहिवासी. यांच्या घराजवळ नगरपालिकेची नाली आहे आणि तिथून नेहमी मच्छरांचा भडीमार असतो. मोटवानी मच्छरांच्या त्रासाने त्रस्त झाले. सोबतच शेजारी देखील मच्छरामुळे त्रस्त झाले आहे. मोटवानी यांना जिल्ह्यातील ही समस्या मुख्य समस्या असल्याच लक्षात आलं. आणि थेट लोकसभा निवडणुकीसाठी मच्छरांचा नायनाट करने याकरिता थेट खासदार बांण्याचाच संकल्प केला. आज त्यांनी महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या गाठल्या. त्यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय आणि दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच सांगितलंय.



