- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Author: breakingvidarbha
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 च्या प्रकल्पास अधिक गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशीप कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून काम करत असतांना प्रकल्प विकासकांना ज्या ठिकाणी अडीअडचणी येत असतील, तर संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा बैठक घेऊन घेऊन त्या समस्या सोडवाव्यात. यासंदर्भातील अहवाल पुढील 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राबवितांना प्रकल्प विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नसल्याचे नमुद करून मुख्यमंत्री म्हणाले की, जमीन अतिक्रमीत झालेल्या ठिकाणी प्रकल्प विकासक तसेच जिल्हाधिकारी,…
पदभार स्वीकारताचा कामाला सुरुवात वर्धा : शासनाने नुकतेच आदेश निर्गमित करुन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिक येथे आयुक्तपदी बदली केली असून त्यांच्या जागेवर राज्याच्या राज्य कर विभागाच्या सहआयुक्त वान्मथी सी. यांची जिल्हाधिकारी वर्धा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी 10.30 वाजता नवनियुक्त जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. तामिळनाडू येथील इरोड जिल्ह्यातील त्या मूळ रहिवासी आहेत. वान्मथी सी. या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2015 च्या बॅचच्या असून त्यांनी 152 वी रँक प्राप्त केली होती. आयएएस रँक मिळाल्यानंतर त्यांनी यापुर्वी नंदूरबार येथे 2018-2019 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणुन सेवा दिली. जुलै 2019 ते 2022 या कार्यकाळात त्यांनी धुळे जिल्हा…
श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशनचा उपक्रम ८ फेब्रुवारी रोजी होणार मेळावा वर्धाः वर्धा येथे श्री. संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा द्वारा आयोजित पाचवा तेली समाज सर्वशाखीय राज्य स्तरीय उपवधू-वर पालक परीचय मेळावा शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ ला ला सकाळी ११ वाजता मुडे सेलिब्रेशन हॉल रिंग रोड, जुनापाणी चौक, वर्धा येथे संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा खासदार रामदास तडस व समाजातील इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित असणार आहे. या तेली समाज सर्व शाखेतील उपवधु-वर व पालक परिचय मेळावा व ‘‘स्नेहीबंध’’ परिचयपत्र पुस्तीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व समाज बांधवाच्या उपस्थितीत होणार आहे. यासदर ‘‘स्नेहीबंध’’ परिचयपत्र…
खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करावे मुंबई : 27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची…
गुंतवणूकदारांना मदतीसाठी “कंट्री डेस्क” विशेष कक्ष जागतिक, प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता मुंबई : देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य शासनमार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी “कंट्री डेस्क” या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणूकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्य सरकार व प्रमुख उद्योग गटांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने औद्योगिक समन्वय सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्रात प्राधान्याने गुंतवणूक व्हावी यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांसोबत संवाद प्रस्थापित करण्यात…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे आयोजन भुवनेश्वर येथे अंतरविद्यापीठ स्पर्धा होणार वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दोनदिवसीय आंतरमहाविद्यालयीन योग स्पर्धांचे आयोजन येथील प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन बापूरावजी देशमुख फाउंडेशनची सचिव साहिल देशमुख यांच्या हस्ते व विद्यापीठाच्या सिनेट सदस्य रोशनीताई खेलकर, प्राचार्य डाॅ. सोनाली सिरभाते निवड समितीचे अध्यक्ष डॉ. तेजसिंग जगदाळे, सदस्य डाॅ. देवेंद्र वानखेडे, डॉ. सोनाली काकडे, पंच नागपूर व वर्धा जिल्हा योग संघटनेचे सचिव अनिल भोगावकर व संजय देशमुख या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित झाले. या योग स्पर्धेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पुरुष व महिला योग संघ निवडण्यात आला. किटस् युनिव्हर्सिटी भुवनेश्वर…
जिद्द, चिकाटीमुळे कार्तिकला घातली यशाने गवसणी वर्धा : भारतीय सेनेत अधिकारी बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, त्यातील काहीच यशस्वी होतात. यात कारंजा घाडगे येथील कार्तिक राजू बाजारे याने आपल्या जिद्द व मेहनतीच्या बळावर भारतीय नौदलात सबलेफ्टनंट पदावर अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. कारंजा तालुक्यातील व परिसरातील तो यात निवड झालेला पहिलाच अधिकारी आहे. त्याने हे यश जिद्दीच्या बळावर प्राप्त केले. कार्तिकचे प्राथमिक शिक्षण गावातील गुरुकुल स्कूल येथे झाले. तर दहावी पर्यंतचे शिक्षण त्याने यवतमाळ येथे घेतले. दहावीत चांगले गुण मिळाल्याने जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या त्याच्या पालकांनी त्याला पुढीलशिक्षणाकरिता शहापूर येथील डिफेन्स अकॅडमीमध्ये एनडीए परीक्षेची तयारी करण्याकरिता पाठवले. त्यानंतर…
सावंगी रुग्णालयातील रेडिएशन व सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट चमूचे सुयश वर्धा : अवघ्या छत्तीस वर्षीय तरुणीला जटील अशा गर्भाशयमुख कर्करोगाचे निदान झाले. एक्स्टर्नल बीम रेडिएशन उपचार करूनही कर्करोग पेशी शिल्लक राहत असल्याने ही अवस्था दुर्मिळ व जटिल अशी होती. अशा अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुणीवर सावंगी (मेघे) येथील सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कँसर हॉस्पिटलमधील रेडिएशन आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट चमूने वेळीच योग्य उपचार करीत रुग्णाची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली. चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी उज्ज्वला (बदललेले नाव) ही असह्य वेदनेमुळे सतत त्रस्त होती. गर्भाशयमुखाच्या कर्करोगामुळे ही तरुण रुग्ण मृत्यूशी झुंज देत असताना नातेवाईकांनी तिला जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले.…
दिव्यांग विद्यार्थी करतील कलागुणांचे सादरीकरण वर्धा : सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाद्वारे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मंगळवार, दि. ३ रोजी इंद्रधनुष्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग तसेच मतिमंद मुलामुलींच्या शाळांमधील विद्यार्थी विविध कलांचे सादरीकरण करणार आहेत. दिव्यांग कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व रवी नायर भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावंगीच्या विद्यापीठ सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी १२ वाजता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. विवेक…
आर्वी शहरालगत घडली घटना वर्धा : आर्वी येथे विद्युत पारेषनच्या सब स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. ट्रान्सफॉर्मर ने अचानक पेट घेतल्याने ही आग आजूबाजूला पसरली. ट्रान्सफॉर्मर मध्ये असलेल्या ऑईलमुळे आग वाढली. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. आर्वी शहराच्या बाहेर असलेल्या आय टी आय कॉलेज नजीक हे सबस्टेशन आहे. वर्धा – आर्वी मार्गावर असलेल्या या 132 के व्ही सब स्टेशनमध्ये ट्रान्सफॉर्मरने अचानक पेट घेतला. आग पसरत गेल्याने आगीने भयानक रुप घेतले. सब स्टेशनच्या काही दूर अंतरावर लोकवस्ती असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप…

