Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
  • जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Thursday, April 16
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » मनसावळी गावातील नागरिकांना दळण मिळतेय फुकट
कृषी

मनसावळी गावातील नागरिकांना दळण मिळतेय फुकट

स्वयंपाक घरातील पिठाला ग्राम पंचायतीच्या आटा चक्कीचा आधार
breakingvidarbhaBy breakingvidarbhaApril 11, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
वर्धा : गावात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पिठाला आटा चक्कीमधून दळून आणलं जातं. पण हेच दळण गावकऱ्यांना वर्षभर मोफत मिळत असेल तर पर्वणीच म्हणावी लागेल. गावाला निशुल्क दळण दळून मिळण्याची ही संधी मनसावळी या वर्धा जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावकऱ्यांना मोफत दळण दळून जर पाहिजे असेल तर मात्र ग्राम पंचायतीला शंभर टक्के कर भरणा करणे अत्यावश्यक आहे. या अटीवरच गावात ग्राम पंचायतने पुढाकार घेऊन उभारलेल्या आटा चक्कीवर मोफत दळण दिले जात आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी कर रुपात उभा केला जातो पण अलीकडे कर भरण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने मनसावळी ग्राम पंचायतीने शंभर टक्के कर भरा आणि वर्षभर मोफत दळण दळून घ्या ! ही संकल्पना सुरू केली आहे.
राळेगाव – हिंगणघाट मार्गावर असलेले मनसावळी हे गाव हिंगणघाट तालुक्यात येते. १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात गेल्या काही वर्षात कर वसुली ही कमी प्रमाणात होती. कर भरायला मागेपुढे पाहणाऱ्या अनेकांनी गेली सात – आठ वर्षे कराचा भरणा केला नसल्याची उदाहरणे या गावात होती. ग्राम पंचायतीचे आर्थिक उत्पन्नाचे साधन असलेल्या कर वसुलीसाठी कर्मचारी घरोघरी पोहचले तरी प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव मनसावळी ग्राम पंचयातचे कर्मचारी गजानन हिवसे यांनी सांगितला. त्यामुळे येथील सरपंच सौ. प्रांजली मुकेश भोयर यांनी कर वसुली व्हावी या हेतूने गावात कर देणाऱ्यांना मोफत दळण देण्याचा निश्चय केला. याला ग्रामसेविका दीपिका धोपटे यांची साथ मिळाली. ग्राम पंचायतच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधी आणि विशेष फंडातून आटा चक्की खरेदी करण्यात आली. आटोमॅटिक पद्धतीने चालणारी ही आटाचक्की नागरिकांना देखील चालविणे सोपे झाले. गहू टाका, बटन दाबा आणि दळण दळून घेऊन जा असाच उपक्रम सुरू झाला. पण हे होत असताना मात्र नागरिकाने कर भरला आहे की नाही याची खातरजमा केली जात आहे.
आटा चक्की सुरू झाल्यावर मात्र ग्राम पंचायत समोर एक प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे विजबिल भरण्याचा त्यासाठी तरतूद करून ठेवण्यात आली आहे. थ्री फेजचे मीटर येथे बसविण्यात आले आहे . पुढे देखभाल दुरुस्ती साठी देखील तरतुद केली जाणार आहे. वीज बिल भरण्यासाठी पैसे उपलब्ध  जर झाले नाही तर सरपंच आणि सदस्यांच्या तीन महिन्यांच्या मानधनातून आम्ही विजेचे बिल भरू अशी तयारी असल्याचे सरपंचा प्रांजली मुकेश भोयर यांनी संगीतले आहे.
 ग्राम पंचायतीच्या या संकल्पनेचा गावाला फायदा देखील व्हायला लागला आहे. नागरिक आपला घर व पाण्याचा टॅक्स भरून आपली जबाबदारी पूर्ण करीत  आहे. घर कराची पावती आटा चक्कीवर दाखवायची आणि आपले गहू, ज्वारी, बाजरी, डाळ आदी धान्य दळून न्यायचे, असाच नित्यनियम गावकरी पाळताना दिसत आहे. ग्राम पंचायतीच्या सरपंच प्रांजली भोयर यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या प्रयोगाने कर गोळा होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 1200 लोकसंख्या असलेल्या मनसावळी या गावात 2021-22 मध्ये 1 लाख 50 हजार इतकी कर वसुली झाली होती, तर 2022-23 मध्ये 1 लाख 90 हजार इतकी कराची वसुली झाली आहे. कर भरण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. हिंगणघाट – राळेगाव रस्त्यावर असलेल्या ग्राम पंचायत कार्यालयात उभारण्यात आलेल्या  आटा चक्कीतील मोफत दळण योजनेचा रस्त्यावरून दिसणारा आकर्षक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
breakingvidarbha

Post Views: 257
Maharashtra womens
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी

January 4, 2025

जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा

December 31, 2024

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती

December 31, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

By breakingvidarbhaMarch 13, 20250

जिल्हा परिषदेच्या औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत औषध रेकॉर्ड मध्ये आढळली तफावत वर्धा :…

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!

January 14, 2025
Demo
Top Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (914)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (913)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (800)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (744)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (693)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.