Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, June 3
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » वर्धा जिल्हा प्रशासनाचा ‘सेवादूत’ प्रकल्प नागरिकांच्या सेवेत
अपडेट

वर्धा जिल्हा प्रशासनाचा ‘सेवादूत’ प्रकल्प नागरिकांच्या सेवेत

सेतू व आदर्श आपले सरकार सेवा केंद्रांना भेटी
breakingvidarbhaBy breakingvidarbhaDecember 28, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

नाशिक व अमरावती आयुक्तांकडून उपक्रमाची पाहणी

सेवादूत प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना घरी प्रमाणपत्र वितरण

वर्धा: सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत अधिसूचित सेवा उपलब्ध झाल्या पाहिजे, यासाठी सेवा हमी कायदा अस्तित्वात आला आहे. यापुढे जावून आपणास नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध करून द्यावयाच्या आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाने त्या अनुषंगाने सुरु केलेला ‘सेवादूत’ हा प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे. संपुर्ण राज्यभर हा उपक्रम राबविण्यासारखा आहे, असे नाशिक व अमरावती विभागाच्या राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सेवादूत’ या प्रकल्पांतर्गत नागरिकांना 34 प्रकारच्या शासकीय सेवा घरपोच दिल्या जातात. या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी नाशिक विभागाच्या राज्य लोकसेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी व अमरावती विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त रामबाबू नरकुल्ला वर्धा येथे आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात त्यांनी या प्रकल्पाची कार्यप्रणाली समजून घेतली. प्रकल्प कशा पध्दतीने राबविण्यात येतो, त्याचा नागरिकांना होणारा फायदा, प्रशासकीय उपयुक्ततेबाबत दोनही आयुक्तांनी माहिती जाणून घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपवनसंरक्षक राकेश सेपट, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. सेवादूत प्रकल्पाद्वारे 34 प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या सेवांसाठी जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर प्राथमिक माहिती व सेवेचा प्रकार नोंदविल्यानंतर प्रकल्पाचा सेवादूत लाभार्थ्यांच्या घरी येतो. आवश्यक असलेल्या सेवेसाठी घरूनच कागदपत्र स्कॅन करून ऑनलाईन अर्ज दाखल करून घेतो. अर्जावर कारवाई झाल्यानंतर सेवादूत पुन्हा घरी येऊन सेवा घरपोच देतो.

काहीच महिन्यापुर्वी सुरु झालेली ही प्रणाली सुरुवातीस वर्धा शहर, नंतर नगरपालिका क्षेत्र व आता सर्व तालुका ठिकाणी कार्यान्वित झाली आहे. अतिशय कमी कालावधीत नागरिकांना आतापर्यंत 4 हजार 423 सेवा घरपोच देण्यात आल्या आहे. दररोज सरासरी 50 अपॅाईनमेंट प्रणालीवर दाखल होतात. नागरिकांना थेट घरपोच सेवा देणाऱ्या या प्रकल्पाची महिती घेण्यासाठी आलेल्या नाशिक व अमरावती विभागाच्या राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांनी प्रकल्प समजून घेतल्यानंतर हा उपक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे मत नोंदविले. हा उपक्रम राज्यभर राबविण्यासारखा आहे. आयोग राज्य शासनास तशी सिफारस करणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

कालमर्यादेत सेवा देण्याची संस्कृती रुजवा

राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांनी विभाग प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सेवा हमी कायद्याच्या जिल्ह्यात होत असलेल्या अंमलबजावणीची त्यांनी माहिती घेतली. नागरिकांना वेळेत, कमी त्रासात आणि पारदर्शकपणे सेवा उपलब्ध झाल्या पाहिजे, यासाठी सेवा हमी कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्यांतर्गत सेवा देण्याची संस्कृती सरकारी यंत्रणेमध्ये रूजली पाहिजे, असे आयुक्तांनी संवाद साधतांना सांगितले.

आयुक्तांच्याहस्ते घरपोच सेवा वितरण

आयुक्त चित्रा कुलकर्णी व रामबाबू नरकुल्ला यांनी सेवादूत प्रकल्पांतर्गत काही लाभार्थ्यांना घरपोच प्रमाणपत्रांचे वितरण केले. जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावरील सेतू केंद्र महिला गटाद्वारे चालविण्यात येत आहे. वर्धा येथील सेतू केंद्राला भेट देऊन पाहणी केली. आदर्श आपले सरकार सेवा केंद्रांना देखील आयुक्तांनी भेटी दिल्या. सेवादूत प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांचा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

breakingvidarbha

Post Views: 227
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

By breakingvidarbhaMay 13, 20260

 वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजाती वर्धा : 9 मे या दिवशी असलेल्या ग्लोबल बिग डे…

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025
Demo
Top Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (961)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (953)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (824)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (786)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (739)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.