वर्धा – माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मागणीनुसार मुंबई मंत्रालयात दिव्यांग मंत्रालय सुरू होत असल्याने वर्ध्यात प्रहार कडून आंबेडकर चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
दोन दिवसा पूर्वी बच्चू कडू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई मंत्रालय येथे याबाबत बैठक पार पडली. यात दिव्यांग स्वतंत्र मंत्रालयची मान्यता मुख्यमंत्री यांनी दिली. येत्या 3 डिसेंबर ला जागतिक दिव्यांग दिनी याची घोषणा करण्यात येणार आहे.
देशात महाराष्ट्र प्रथम राज्य आहे की जिथे हे स्वतंत्र खात होणार आहे. त्याचाच आनंद म्हणून ढोल ताशा च्या गजरात मिठाई खाऊन हा आनंद एकत्रितपणे साजरा करण्यात आला.
यावेळी प्रहार दिव्यांग क्रांति आंदोलनचे विदर्भ प्रमुख हनुमंतराव झोटिंग,जिल्हा प्रमुख प्रमोद कुरटकर,हरिभाऊ हिंगवे,
प्रहार जनशक्ति पक्ष जिल्हा प्रमुख विकास दांडगे, जयंत तिजारे, राजेश सावरकर,आशिष अंभोरे,विवेक धोंगडे,श्रीकांत पेरकुंडे,मुकेश वाघमारे, प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Breaking News
- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी


