वर्धा – भारतीय लोकशाही मोर्चा वर्धा द्वारा आयोजित संविधान सन्मान पदयात्रेचे खरांगणाच्या स्वावलंबी विद्यालयात सोमवारी सकाळी आगमन झाले. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजवून सांगताना निखिल जवादे म्हणाले कि संविधान नीट समजून घेतले तरच स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ येईल. ” देश ना राजाचा ना एका धर्माचा, आता हा सर्वांचा सर्वांसाठी” म्हणून भारताचा प्राण आहे संविधान या कथनाचे महत्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे त्यांनी आवाहन केले. सेवाग्राम ते आष्टी या टप्याचे संयोजक अतुल शर्मा यांनी यात्रेची संकल्पना समजवून सांगितली.या प्रसंगी सरपंच निर्मलाताई अक्कलवार यांनी मूलभूत कर्तव्यांचे वाचन केले. कार्यक्रमाला उपसरपंच राजू अवथळे, ग्राम पंचायत सदस्य अनिताताई, इंदूताई आणि विनोद भाऊ तसेच शाळेचे शिक्षक मोहन टवले यांच्यासह सर्व पदयात्री उपस्थित होते.
Breaking News
- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी


