सांगली : सांगलीतील कुपवाड परिसरामध्ये चुकून आलेल्या सांबर जातीच्या प्राण्याला पकडण्याचे वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी गेले चाळीस तासाहून अधिक हे सांबर पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाकडून केले जात आहे. शुक्रवारी सकाळी एक सांबर कुपवाड परिसरामध्ये आल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाने आपली सर्व यंत्रणा गतिमान केली होती. हे सांबर नागरी वस्तीत जाऊ नये व त्याला सुरक्षित पकडण्यासाठी वेगळ्या ठिकाणी ट्रॅप सुद्धा लावण्यात आले होते, मात्र ते सांबर हाती येत नव्हते. शनिवारी दिवसभरात सुद्धा वन विभागाने प्राणी मित्रांच्या मदतीने हे सांबर पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले होते. भारत सूतगिरणीचे आवारामध्ये बंदिस्त कंपाउंड मध्ये हे सांबर दिवसभर वास्तव्यास होते. सायंकाळी त्याला पकडत असतानाच या सांबराने वन विभागाच्या ट्रॅपचा हुलकावणी देत मोठी उडी घेतली आणि ते पुढे पळून गेले. ते वन विभागाच्या ट्रॅप पासून जरी पळाले असले तरी ते अद्याप बंदिस्त ठिकाणीच वास्तव्यास आहे. त्यामुळे शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी हे सांबर वन विभागाकडून पकडले जाईल किंवा त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल अशी माहिती व विभागाकडून दिली जात आहे. मात्र गेले चाळीस तासापासून सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन आणि यामुळे वन विभागाची होत असणारी दमछाक याची चर्चा सांगलीमध्ये जोरदार सुरू आहे.
Breaking News
- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी


