वर्धा – वर्ध्यात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वर्धेकरांनी अभिवादन केले आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले,पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याच परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ फोटोची प्रदर्शनी देखील लावण्यात आली आहे. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देऊन बाबासाहेबांच्या जुन्या आठवणी जाणून घेतल्या. रिफॉरमिस्ट असोसिएशनने याचे आयोजन
केले होते.

डॉ. बबासाहेब आंबेडकर चौक परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली दिली.


