वर्धा – सेलू येथील संत केजाजी मूकबधिर विद्यालयात आज महापरिनिर्वाण दिवसांवर डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन करून यावेळी विद्यार्थ्यांनी महामानवाला अभिवादन केले. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक भास्कर गुढधे यांनी महमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. तर शिक्षकांनी देखील महामानवाला अभिवादन करून समाजात एकात्मतेची रुजवन व्हावी असेच मत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाला विशेष शिक्षक अमोल चंदेल, राजू काळबांडे, नितीन झोटिंग, प्रमोद नगराळे, मंगेश हांडे आदी उपस्थित होते.
Breaking News
- कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
- जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
- शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी


