वर्धा : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मार्फत नवं नियुक्त तालिका अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी हिंगणघाट मतदार संघाचे आमदार समीर कुणावार यांच्या नावाचा निर्वाचित तालिका अध्यक्षांच्या सूचित समावेश करण्यात आला. हिंगणघाट क्षेत्रातील आमदाराची तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या क्षेत्रात समस्या मांडण्यात मदत होणार आहे. तालिका अध्यक्ष हा बहुमान मिळाल्याने आमदार समीर कुणावार यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व सहकारी आमदारांचे आभार मानले. महाराष्ट्राच्या विधानसभेत तालिका अध्यक्षाला महत्वाचे स्थान आणि बहुमान असल्याने आमदार समीर कुणावार यांनी त्यांच्या मतदार संघाच उत्तम नेतृत्व केल्याने व त्यांच्या राजकीय अनुभव लक्षात घेऊन त्यांना हि संधी दिल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या पदाचा मान ठेवत संधीच सोन करू असे मत आमदार समीर कुणावर यांनी नियुक्ती झाल्यानंतर व्यक्त केले.
Breaking News
- औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
- अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
- युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
- राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
- अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
- शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
- जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती


