वर्धा : सर्वोदय समाजाचे 48 वे संमेलन वर्ध्याच्या सेवाग्राम येथे होत आहे. 14 मार्च रोजी या संमेलनाचे उदघाटन तिबेटचे माजी पंतप्रधान प्राध्यापक रिंनपोछे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सर्व सेवा संघाचे पूर्व अध्यक्ष अमरनाथ भाई यांच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी संग्रहालय दिल्ली येथील अध्यक्ष श्रीमती तारा गांधी भट्टाचार्य उपस्थित राहणार आहे. ‘ न युद्ध न हिंसा, आम्हाला हवी शांती आणि अहिंसा ‘ असे या संमेलनाचे घोषवाक्य आहे. यावेळी स्वागताध्यक्ष माजी पालकमंत्री सुनील केदार असणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल यांनी दिली आहे. स्थानिक विश्राम गृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री सुनिल केदार, गांधीवादी आशा बोथरा, संयोजक सोमनाथ रोडे, अविनाश काकडे उपस्थित होते.
14 , 15 आणि 16 मार्च असे तीन दिवस होणाऱ्या या संमेलनात विविध गांधीवादी आपले विचार मांडतील. याशिवाय देशभरातून सर्वोदयी कार्यकर्ते सहभागी होणार आहे. संमेलनात डॉ. अभय बंग, जल पुरुष डॉ. राजेंद्र सिह, वन मित्र मोहन हिराभाई हिरालाल, गांधीवादी विचारवंत रामचंद्र राही, कुमार प्रशांत, धीरूभाई मेहता, डॉ. सुगण बरंठ, अनामलाई, रमेश ओझा, गौतम बजाज, अरविंद अंजुम, प्रा. जावेद पाशा, संजय सिह, राकेश रावण, डॉ. कृष्ण प्रसाद, डॉ. विभा गुप्ता, डॉ. विश्वजित आदी मार्गदर्शन करणार आहे.समेलनाचा समारोप

16 मार्च रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत होणार आहे.या समारोप कार्यक्रमाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जे एम वाघमारे राहणार आहे. या संमेलनात सातारा येथील जेष्ठ गांधी अण्णा जाधव यांनी केलेल्या अविरत समर्पित कार्याबद्धल ‘ महात्मा गांधी पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. संमेलनासाठी दोन हजार खुर्च्या असतील अशा क्षमतेचा सभामंडप उभारण्यात येणार आहे. येथे स्टॉल ची उभारणी करण्यात येणार आहे. विविध ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र मधील 25 जिल्ह्यातून प्रतिनिधी येथे पोहचणार आहे. तर 20 विविध राज्यातून प्रतिनिधी दाखल होणार आहे. बस स्थानक व रेल्वे स्थानका पासून संमेलन स्थळी पोहचण्याची वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.


