वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री साडे बारा वाजता दरम्यान घडला.डॉक्टर ज्योती क्षीरसागर (राहणार. मालेगाव, जिल्हा -वाशीम ),डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे (राहणार -अमरावती ), भरत क्षीरसागर (राहणार. मालेगाव, जिल्हा -वाशीम )अशी मृतकाची नाव आहे.घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी पोहचत वाहतूक सुरळीत केली.
समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जातं असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून जबर धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव येथून नागपूरला जातं असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचाजागीच मृत्यू झालाय.ज्योती क्षीरसागर आणि फाल्गुनी सुरवाडे या दोन्ही डेंटिस्ट डॉक्टर असून मैत्रीण आहे.नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जातं असताना ज्योती क्षीरसागर हिचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार ही समोरील ट्रकला मागून धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत करण्यात आली. महामार्गपोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना माहिती दिली.


