Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
  • जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Thursday, April 16
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार.!
अपडेट

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार.!

breakingvidarbhaBy breakingvidarbhaDecember 26, 2023No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध

पुणे : राज्य शासनाच्यावतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात; आगामी काळातही पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल इलेव्हन २३ येथे आयोजित ‘पुणे अचिव्हर्स २०२३’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, माजी आमदार विलास लांडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, , संघटक संजयजी भोकरे, संघाचे महासचिव डॉ विश्वास आरोटे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गोविंद वाकडे महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष नितीन शिंदे, पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीचे सदस्य बबन पवार आदी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी गोविंद वाकडे व डिजिटल मिडिया अध्यक्षपदी सिध्दार्थ भोकरे यांची निवड झाल्याबद्दल यावेळी पत्र देऊन ना अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुढे पवार म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा आदरपूर्वक सन्मान करण्यासाठी, त्याच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक मानधन देण्यात येत आहे. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत करण्यात येते. या निधीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५० कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता आधीचे ५० कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील ५० कोटी असे १०० कोटी रुपये झाले आहेत. पत्रकारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून मराठी पत्रकारितेचा पाया रचला आहे. मराठी पत्रकारितेला निर्भीडता, नि:पक्षपातीपणा आणि लोकाभिमुखतेचा वारसा मिळालेला आहे. राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आलेले निर्णय, ध्येयधोरणे, उपक्रम नागरिकापर्यंत पोहचविण्याचे काम अतिशय चांगल्याप्रकारे माध्यमांनी केले आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत करण्यात आलेली कामे तळागळापर्यंत पोहचविण्याचे माध्यमांनी अतिशय चांगले काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाच्यावतीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला.

सुरुवातीला लोकशिक्षण, ज्ञानप्रसार आणि देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरीता पत्रकारिता करण्यात येत होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटीशकालीन चुकीच्या धोरणाविरुद्ध विरोध करण्याचे काम मराठी माध्यमांनी नेटाने केले. मराठी वृत्तपत्रातून समाज घडविण्याचे काम करण्यात आले. त्या काळातील ध्येयनिष्ठ पत्रकारांनी वृत्तपत्र समाज प्रबोधनासाठी, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी, जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम असल्याचे दाखवून दिले. आज काळात या गोष्टीचा आदर्श घेऊन काम करण्याची गरज आहे.

समाज माध्यमाच्या युगात नागरिकांना जलद बातम्या मिळण्याकरीता पत्रकार काम करीत असतात. चुकीच्या गोष्टीवर टिकाटिप्पणी करणे माध्यमांचा हक्क आहे.पत्रकारांनी चांगल्या गोष्टी समाजापुढे आणण्यासाठी आणि वाईट गोष्टीला रोखण्यासाठी काम करावे. घडलेल्या घटनेचे वार्तांकन करण्यासोबत सामाजिक स्वास्थ जपण्यासाठी वस्तुस्थितीदर्शक बातमी दाखविण्याचे काम माध्यमांनी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

पुणे अचिव्हर्स २०२३’ या कॉफीटेबल पुस्तकाच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीना समाजापुढे आणण्याचे काम केले आहे. देशाच्या, समाजाच्या प्रगतीत आणि उन्नतीत त्यांचे योगदान आहे. यातून इतरांनीही प्रेरणा घेऊन आपापल्या क्षेत्रात काम करत अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे, असे उपमुख्यमंत्री  पवार म्हणाले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, बदलत्या युगात प्रवाहाच्याविरुद्ध निर्भीडपणे आणि विवेकबुद्धीला जागृत ठेवून सामाजिक वास्तव्य समाजासमोर आणणे हे खऱ्या पत्रकारितेचे काम आहे. वंचित, दुर्बल अशा घटकांचा आवाज होण्याचे कामही पत्रकारितेने केले आहे. समाजात महिलांवर होणाऱ्या घटना आणि अत्याचार माध्यमांनी समोर आणावे, घडलेल्या घटनेबाबत सतत पाठपुरावा करुन संबंधित पीडिताला न्याय देण्याची भूमिका ठेवावी, असेही श्रीमती चाकणकर म्हणाल्या.

वसंत मुंडे म्हणाले पिंपरी-चिंचवड या औद्योगिक, ऐतिहासिक, अध्यात्मिक नगरीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करुन त्यांची यशोगाथा कॉफ़ीटेबल पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्यात आली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांना ‘पुणे अचिव्हर्स २०२३’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले .तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महासचिव डॉ विश्वास आरोटे यांचा शिवरायांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके. संजय फुलसुंदर , डॉ स्वामी शिरकुल वैदु, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वृत्तवाहिनी पुणे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष अतुल परदेशी, पुणे शहर जिल्हा अध्यक्ष राकेश वाघमारे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाजीराव फराकटे, जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर नवले यांसह पदाधिकारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन नितीन शिंदे यांनी मानले.

breakingvidarbha

Post Views: 103
अध्यात्मिक नगरीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ऐतिहासिक पिंपरी-चिंचवड या औद्योगिक
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

By breakingvidarbhaMarch 13, 20250

जिल्हा परिषदेच्या औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत औषध रेकॉर्ड मध्ये आढळली तफावत वर्धा :…

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!

January 14, 2025
Demo
Top Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (915)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (913)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (800)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (745)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (694)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.