अंगणवाडी सेविकांनी संपाच्या 25 व्या दिवशी हातात फिरविली चटणी भाकर
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयटक आणि सिटू च्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर चटणी भाकर आंदोलन करून समस्यांकडे लक्ष वेधले आहे. राज्यात गेल्या पंचवीस दिवसापासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहे . वर्ध्यात जिल्हा परिषद समोर देखील पंचवीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे. वेतनश्रेणी, ग्रॅच्युटी, निर्वाह भत्ता या मागण्या आंदोलनातून करण्यात येत आहे. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविकानी घरून चटणी भाकर आणली आणि आंदोलनात ती हातात घेऊन आंदोलन केले आहे. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. शेकडो अंगणवाडी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.

