अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसाव्या दिवशी जेलभार
राज्यव्यापी संप सुरूच; मोर्चा काढून केले जेलभरो आंदोलन
– अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गेल्या तीस दिवसापासून राज्यव्यापी संप सुरू आहे. आज संपाच्या तिसाव्या दिवशी अंगणवाडी सेविकांनी वर्ध्यात मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले. आयटक व सीटू या दोन संघटनांच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध घोषणा देत पोलीस ठाणे गाठले. हजारोच्या संख्येत पोलीस ठाण्यात पोहचलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहेय. वेतन वेळेत करा, शासकीय सेवेत सामावून घ्या, दरमहा पेन्शन सुरू करा, आजारपणाच्या रजा मंजूर करा, यासह विविध मागण्यासाठी हे जेलभरो आंदोलन करण्यात आलेय. जेल भरो आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलाय.

