Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
  • जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Thursday, April 16
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » केळझर येथे सापडली पुरातन जैन मुर्ती
अपडेट

केळझर येथे सापडली पुरातन जैन मुर्ती

पुरातत्व विभागाच्या निरीक्षणानंतर मुर्ती नागपूर येथे रवाना
breakingvidarbhaBy breakingvidarbhaJanuary 4, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

वर्धा : सेलू तालुक्यातील महाभारतकालीन एकचक्री नगर असलेल्या केळझर येथील बुद्धविहार परिसरात पुरातन पाषाणाची मूर्ती आढळून आली आहे. तुळजापूर – नागपूर मार्गावर असलेल्या बुद्ध विहार परिसरात ही मूर्ती आढळून आली आहे. परिसरातील शेतामध्ये शेळ्या चारणाऱ्या गुराख्याच्या निदर्शनास ही मुर्ती आली. अधिक खोदकाम केल्यावर ही मुर्ती बाहेर काढण्यात आली आहे. पुरातत्व विभागाच्या निरीक्षणानंतर मुर्ती गुरुवारी नागपूर येथे हलविण्यात आली आहे.

44 सेंटिमीटर जाडी आणि साडेचार फूट उंच असलेली ही मूर्ती यादवकालीन 13 व्या शतकातील असल्याचे पुरातत्व विभागाची माहिती आहे. अखंड पाषाणात चारही बाजूने या मुर्तीचे कोरीवकाम करण्यात आले आहे. ऐतिहासिक मुर्ती असून जैन धर्मातील तिर्थकार वृषभपंत महाराजांची ही मूर्ती असल्याची माहिती आहे.

केळझर गावातीलच अशोक कुत्तरमारे या शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श लागल्याने दगडाला उत्सुकतेपोटी स्वच्छ केल्यानंतर प्राचीन मूर्ती आढळली. अंदाजे तीनफुट उंचीची काळ्या पाषाणातील अत्यंत कोरीव मूर्ती येथे आढळून आली.विहाराच्या मालकीची असलेली शेती आनंदा खोब्रागडे ठेक्याने करतात. खरीपामध्ये तुरीचे पीक घेतल्यानंतर गुरांच्या चाऱ्यासाठी शेती ट्रॅक्टरने तयार केली. जमिनितील माती खालीवर झाल्यामुळे ही मूर्ती वर आली असावी. यापूर्वी याच ठिकाणी विहिरीचे खोदकाम सुरु असताना तीर्थकार भगवान चंद्रास्वामीची मूर्ती उत्खनात मिळाली होती. याच विहारात सुमारे तेरा फुटाची महाविरांची मूर्ती अंदाजे १९६० ला निघाली होती. नागपूर विद्यापिठाच्या इतिहास संशोधन विभागाच्या माध्यमातुन केलेल्या उत्खननात जैन मंदिराचे अवशेष व मंदिराचा पायवा मिळाला होता. केळझर परिसरात जैन तिर्थकरांच्या मूर्ती मिळतात. येथील जि.प. प्राथमिक शाळेत त्यातील काही मूर्ती बघायला मिळतात. विहार परिसरात मंदिराची कोरीव दगडे मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत. केळझर प्राचीन महाभारतकालीन एक चक्रनगर असल्याचे अनेक इतिहासकारांनी मत व्यक्त केले आहे. येथे भगवान विष्णू, भगवान महाविर, भगवान गौतम बुद्धांच्या मुर्ती उत्खननात मिळतात. या प्राचीन नगरीत पुरातन चार पायऱ्यांची विहीर देखील आहेत. अलीकडील उत्खननात गणेशमंदिर परिसरात खोदकामात मूर्ती मिळाली होती. गणपती मंदिरात त्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे.

मूर्ती निघाल्याची माहिती गावात पसरताच मूर्ती बघण्याकरीता नागरिकांची गर्दी जमली होती. याची माहिती गावातील पोलीस पाटील प्रकाश खंडाळे यांनी तहसीलदारांना दिली. नायब तहसीलदार मधुकर ठाकरे, मंडळ अधिकारी दिलीप मुडे, तलाठी अभिषेक शुक्ला यांनी पाहणी करुन यांची माहिती पुरातत्व विभाग नागपुर यांना दिली. यावेळी आनंदा खोब्रागडे, हिरामण पाटील, ग्राम पंचायत सदस्य प्रविण गायकवाड, शालीनी अंबागडे, सुनिल नगराळे, किशोर खोब्रागडे भन्ते चुलपंत, भन्ते अनोमदसी यांची उपस्थिती होती.

तहसीलदार डॉ. स्वप्नील सोनवणे यांनी खबरदारी घेत येथे पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने देखरेख केली. पुरातत्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक, श्याम बोरकर, शरद गोस्वामी , दीपक सुरा, सोनुकुमार बरनवाल यांनी केळझर येथे भेट देत मूर्तीची पाहणी केली. पुढील सर्वेक्षणासाठी मुर्ती नागपूर येथील पुरातत्व विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. ही मूर्ती नागपूर येथील सेमिनरी हिल येथील पुरातत्व भवन येथे ठेवण्यात येणार आहेय.

breakingvidarbha

Post Views: 81
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

By breakingvidarbhaMarch 13, 20250

जिल्हा परिषदेच्या औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत औषध रेकॉर्ड मध्ये आढळली तफावत वर्धा :…

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा

January 17, 2025

राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!

January 14, 2025
Demo
Top Posts

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (915)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (913)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (800)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (745)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (694)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.