वाहन चालविणाऱ्यांना पुष्पहार घालत आंदोलकांची गांधीगिरी
वर्धा : वर्ध्यात तुळजापूर – नागपूर मार्गावर चालक संघटनानी एकत्र येत हिट अँड रण कायद्याच्या विरोधात आंदोलन केले. हिट अँड रण कायद्याला विरोध करण्यासाठी वाहन चालक वर्ध्यात एकत्र आले होते. जी वाहने रस्त्यावर धावत होती ती वाहने अडवून चालकांना पुष्पहार घालण्यात आले. हिट अँड रण कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा! असे आवाहन वाहन चालक संघटनांकडून यावेळी करण्यात आले.



