सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांचा शहादत दिन
वर्धा : प्रार्थना सभा ही महात्मा गांधी यांचा अद्वितीय आविष्कार आहे, प्रार्थनासभा ही समाजासाठी उपयुक्त ठरणारी आहे. राज्यघटनेतील जे मूल्य आहेत ते महत्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे प्रारूप लिहिले. पंडित नेहरु यांना संविधान समितीवर घ्यायचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. त्यामुळेच आज जे संविधान आहे ते लोकशाहीत उपयुक्त ठरत आहे. संविधांनावर महात्मा गांधी यांची अमृतछाया आहे.लोकशाहीला आजच्या परिस्थिती मध्ये तुडवले जात आहे. हिंसा, हत्या, बलात्कार, खोटे, तिरस्कार या बाबी सतत पसरविले जात आहे. या बाबी सतत वाढत आहे, आमचे बहुमत आहे आम्ही काहीही करू शकतो अशी भावना निर्माण झाली आहे. अशी टीका महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे पाहिले कुलगुरू अशोक वाजपेयी यांनी केली. महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रम येथे बापूंच्या शहादत दिवसांवर मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल, मंत्री विजय तांबे, जयश्रीताई, गंगूताई सुरकार यावेळी उपस्थित होत्या. वैष्णो जण तो तेणे कहीए या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

पुढे बोलताना अशोक वाजपेयी म्हणाले की, समाजमाध्यमासारख्या तंत्रज्ञानाचा वापर हे सर्व पसरविण्यासाठी केला जात आहे. यांत्रिकीकरण ला महात्मा गांधी यांचा विरोध होता, रवींद्रनाथ टागोर यांचा देखील यांत्रिकीकरण ला विरोध होता. 56 वर्षात बुनियादी तत्व देखील विचारात न घेता महात्मा गांधी यांना विभाजनासाठी दोषी ठरविले जात आहे.
आता तर बुलडोजर ने घरे पाडली जात आहे. माध्यमांमधून खोटे पुरविले जाते आहे. तिरस्कार पसरविला जात आहे, शिक्षणापासून विनय आणि ज्ञान मिळते असे म्हटले जाते पण दबंगगिरी वरचढ ठरविली जात आहे. त्यांची प्रशंसा होते आहे. ज्या संवैधानिक संस्था आहे, त्याचेही अशक्तीकरण होत आहे, मग ते निवडणूक आयोग असेल, न्यायालये असेल आणखी काही संवैधानिक संस्था आहेत ज्यांचे अशक्तीकरण होत आहे.



