Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, June 3
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » जपानला एका विद्यार्थ्यासाठी ट्रेन थांबते, मग आमच्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी ट्रेन का थांबत नाही?
बातम्या

जपानला एका विद्यार्थ्यासाठी ट्रेन थांबते, मग आमच्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी ट्रेन का थांबत नाही?

तुळजापूर रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे थांब्यासाठी साखळी उपोषण
breakingvidarbhaBy breakingvidarbhaFebruary 2, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

तुळजापूरच्या शाळकरी विद्यार्थ्यांचा सवाल

जलद गाड्यांना थांबा देण्याची चार वर्षांपासून होतेय मागणी

साखळी उपोषणात शाळकरी विद्यार्थी देखील झाले सहभागी

(आशिष इझनकर)
वर्धा : जपानला एका विद्यार्थ्यासाठी ट्रेन थांबते, मग आमच्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी ट्रेन का थांबत नाही? असा सवाल शाळकरी विद्यार्थ्यांनी उपोषण मंडपात उपस्थित केला. दळणवळणाच्या मुबलक साधनापासून दूर असलेल्या आमच्या गावात किमान जलद ट्रेन तरी थांबावी अशी रास्त अपेक्षा बाळगून विद्यार्थ्यांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदविला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येमुळे रेल्वे थांब्यासाठी चाललेल्या उपोषणाच्या साखळीकडे लक्ष वेधले गेले आहे.
वर्ध्याच्या सेलू तालुक्यात येणाऱ्या तुळजापूर (दहेगाव) येथे जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी नागरिक विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला बसले आहे. शिक्षणासाठी दहेगाव येथून बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे थांबा अत्यावश्यक असल्याने शाळकरी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येत या आंदोलनात सहभागी झाले आहे. 27 जानेवारी पासून हे उपोषण सुरू असून शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या मागणीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
नागपूर – वर्धा रेल्वे लाईनवर सिंदी रेल्वे जवळ तुळजापूर(दहेगाव) हे मोठे गाव आहे. सुमारे 25 छोटीमोठी गावे येथील रेल्वे स्थानकाशी जुळून आहे. दळनवळणाचे प्रमुख साधन येथे रेल्वे हेच आहे. येथे कित्येक वर्षापासून जलद गाड्यांना थांबा देण्यात आला होता. परंतु कोरोना काळ आला आणि रेल्वे मंत्रालयाने आणि अधिकाऱ्यांनी हा थांबा बंद केला. केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने येथील नागरिकांनी खासदार रामदास तडस यांना अनेकदा निवेदने दिली. याशिवाय रेल्वे प्रशासनाला देखील निवेदने देत विनंत्या करण्यात आल्या आहे. अलीकडेच काही दिवसांपूर्वी येथे रेल्वे रोको आंदोलन करून नागरिकांनी मागणीकडे लक्ष वेधले होते. परंतु प्रत्येकवेळी आंदोलन केल्यावर केवळ आश्वासन देण्यात आले पण त्यावर तोडगा मात्र निघाला नाही.
चार वर्षांपासून ही मागणी होत असताना प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 27 जानेवारी पासून नागरिकांनी विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वाखाली
तुळजापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे साखळी उपोषण सुरू केले आहे. तुळजापूर (दहेगाव) येथे गेल्या चार वर्षांपासून जलद गाड्या थांबणे बंद झाले आहे. कोरोना काळाच्या पूर्वी इंटरसिटी एक्स्प्रेस, जबलपूर एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस आणि मेल या गाड्या तुळजापूर (दहेगाव) येथे थांबत होत्या. कोरोना नंतर मात्र या गाड्यांचे थांबे बंद झाले. हे थांबे पूर्ववत सुरू करावे अशी मागणी गावकऱ्यांनी या साखळी उपोषणातून केली आहे. तुळजापूर या गावाच्या सभोवताल 25 गावे आहेत. या सर्व गावातील नागरिक, कामगार, नोकरदार आणि शाळकरी विद्यार्थ्यांना रेल्वे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. असे असताना गेल्या चार वर्षांपासून येथील नागरिक जलद गाड्यांचा रेल्वे थांबा मागत आहे.

शुक्रवारी रेल्वे विभागाचे महा व्यवस्थापक आंदोलन स्थळी भेट देणार अशा सूचना आंदोलकांना आल्या होत्या. पण व्यवस्थापकांनी देखील आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने नागरिकांची निराशा झाली आहे. या साखळी उपोषणात विदर्भ राज्य आघाडीचे रामकिशोर सिंघमधुपे, अरुण गावंडे, रेखा खेलकर, सतीश इंगळे, अमोल ढाकणे, प्रकाश आतीलकर, अरुण येवले, अजय राजूरकर, वैभव ताकसांडे, मंगेश काकडे ,ओमदेव बाबुळकर, सुधीर कुबडे, संदीप वाणी, अशोक गलांडे, सागर भगत, राजु ठाकरे, योगेश गिरी आदी सहभागी झाले. गावातील शाळकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. विविध सामाजिक संघटनांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
breakingvidarbha

Post Views: 146
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास मिळणार गती

December 31, 2024

वान्मथी सी. यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार

December 26, 2024
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

By breakingvidarbhaMay 13, 20260

 वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजाती वर्धा : 9 मे या दिवशी असलेल्या ग्लोबल बिग डे…

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025
Demo
Top Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (961)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (953)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (824)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (786)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (739)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.