कामगारांचे नेते डॉ. उमेश वावरे यांच्या प्रयत्नांना यश
आर्थिक मदतीसाठी बी आर एस कडून करण्यात आला होता पाठपुरावा
वर्धा : हिंगणघाट च्या गिमाटेक्स्ट कंपनीत अचानक झालेल्या स्फोटात वणी येथील प्रमोद फुलझेले हे कर्मचारी जखमी झाले. या घटनेनंतर त्यांना त्वरित सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी भारत राष्ट्र समितीचे नेते डॉ. उमेश वावरे यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे मदतीची मागणी रेटून धरली होती. कंपनी व्यवस्थापनाशी बैठकी करून सदर मागणीवर विचार करण्यात आला. आर्थिक मदतीसह कुटुंबाला पेन्शन देण्याची मदतीची मागणी यावेळी रेटून धरण्यात आली. अखेर उमेश वावरे यांच्या प्रयत्नाला यश आले. मृतकाच्या वारसाला स्थायी नोकरी, पत्नीला पेन्शन आणि कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या रूपात 9 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.



