वर्ध्यात १८ फेब्रुवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांची होणार सभा
सभेसाठी वर्धेकरांमध्ये उत्सुकता..
वर्धा : वर्ध्यात १८ फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या स्वाभिमानी महा एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी वर्ध्यात स्थळांची चाचपणी केली जात होती, लोकमहाविद्यलय प्रांगण तसेच स्वावलंबी मैदान ही स्थळं सुचविली गेली होती. स्थळाबाबत बऱ्याच चाचपणी नंतर अखेर वर्ध्याच्या बोरगाव मेघे येथील गणेश नगर येथील क्रिकेट मैदान हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. येथे सुमारे एक लाख लोक जमतील अशी येथील व्यवस्था आसणार आहे. याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मनोज वरखेडे यांनी दिली आहे. वर्ध्याच्या शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीची जिल्हा आढावा बैठक आणि पत्रकार परिषद पार पडली. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता हे सभा होणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज वरखेडे, मुख्य समन्वयक डॉ. सुभाष खंडारे, मंगलाताई कांबळे, राजेंद्र साळुंखे, सिद्धर्थ डोईफोडे,महादेव शेंडे, संजय हाडके, वसंत मुराकर, आशिष गुजर , अमोल कोल्हे, दयानंद भटारकर आदी उपस्थित होते.



