वाकेथॉन मधून वॉक ऑन राईट चा संदेश
वर्धा : वर्ध्यात बुधवारी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन आणि वाहतूक शाखेच्या वतीने वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमधून रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात आला आहे.
या वॉकेथॉन रॅलीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, न्यु आर्टस महाविद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांनी हिरवी झेंडी दाखवून वाकेथॉन रॅलीची सुरवात करण्यात आली. यामध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना वॉक ऑन राईट चा संदेश देत समुपदेशन व जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप
वर्ध्यात बुधवार 14 फेब्रुवारी रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा अभियान सन 2024 चा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, उप शिक्षण अधिकारी उषा तळवेकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे,जवाहर नवोदय विद्यालयचे टी जी टी शशिकांत जाधव व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख उपस्थित होते.



