वर्धा – यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर शिरपूर येथे पुलावरून कार कोसळली
एक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी

वर्धा : वर्ध्यावरून यवतमाळ कडे येणाऱ्या इनोव्हा कारला शिरपूर येथे भीषण अपघात झाला. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर येणाऱ्या शिरपूर येथे वर्धा नदीवर असणाऱ्या पुलावरून ही गाडी खाली कोसळली. वाहनचलकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. गाडीमध्ये तिघे जण प्रवास करीत असल्याची माहिती आहे.या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. गाडी पुलावरून पाचशे फूट खाली कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. कळंब पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
Post Views: 170


