बससेवा उपलब्ध करून देत ‘आपला माणूस’ दरवर्षी येतो मदतीला
घोराड यात्रेसाठी मोफत बस सुविधा ; अभ्युदय मेघे यांचा पुढाकार
वर्धा: तिर्थस्थळी पोहचायचे असेल तर ‘आपला माणूस’ तुमच्या मदतीला धावून येईल ही हमीच आता ग्रामीण भागातील नागरिकांना झाली आहे. यावर्षी देखील बससेवा घेऊन आपला माणूस सेलू तालुक्यात पोहचला आहे. घोराड येथील केजाजी पुण्यतिथी महोत्सवात ग्रामीण भागातून पोहचायचे कसे? हा गावखेड्यातील नागरिकांना पडणारा प्रश्न सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे डॉ. अभ्युदय मेघे यांच्याकडून सोडविला जातो. दरवर्षी बससेवा उपलब्ध करून घोराड नगरीत पोहचण्याचा मार्ग सुकर केला जात आहे.



