महिला व युवकांचा मोर्चात मोठा सहभाग
शहरातील मुख्य मार्गाने निघाला मोर्चा
वर्धा : हिंगणघाट शहरात आपल्या हक्कासाठी ओबीसी बांधव एकत्र आले आहे. ओबीसींचे आरक्षण कमी होऊ नये, ओबीसींची जनगणना व्हावी, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसींमधून आरक्षण देऊ नये अशा विविध मागण्यासाठी हिंगणघाट शहरात आज ओबीसी संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. या मोर्चात माजी आमदार राजू तिमांडे, काँग्रेसचे पंढरी कापसे, माजी नगरसेवक सतिश धोबे,निता धोबे याच्या सह अनेक नेत्यानी आणि ओबीसी संघटनेचे नेते सहभागी झाले होते. हरीओम सभागृहातून या मोर्चाला सुरवात करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्याने हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहचला आहे. विविध ओबीसी संघटना, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह महिला व विद्यार्थ्यांचा व युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभाग होता. डोक्यावर टोपी आणि गळ्यात दुपट्टा घालत ओबीसींच्या मुद्द्याकडे या मोर्चातून लक्ष वेधण्यात आले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या रेटून धरण्यात आल्या आहे. सरकारला या मोर्चामधून इशारा देण्यात आला आहे.
Post Views: 210


