गणेश नगर येथील मैदानावर उभारला जातोय भव्य मंच
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी लागलेय कामाला
सभास्थळी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर घेतली जातेय काळजी
वर्ध्यात रविवारी वंचित करणार महाएल्गार
वर्धा : वर्ध्यात रविवारी १८ फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या स्वाभिमानी महा एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी ठरलेल्या गणेश नगर येथील मैदानावर सभेची जय्यत तयारी केली जात आहे. उंच अशा भव्य स्टेजची उभारणी याठिकाणी करण्यात आली आहे.



