ओबीसींच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का हा संविधानाचा अपमान आहे
ओबीसी हक्क सभेचे मत
न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी वर्धेत ऐकवटले ओबीसी बांधव
वर्धा : वर्धा लोकसभा क्षेत्राची ओबिसी हक्क सभा स्थानिक महात्मा लॉन, नालवाडी येथे संपन्न झाली. या सभेत चर्चा व मार्गदर्शनात ओबिसी प्रवर्गात देशात 3700 तर महाराष्ट्रात 360 जातींचा सहभाग आहे. मुस्लीम 36 जाती व परिवर्तीत सर्व ख्रिस्श्चन जाती ओबीसीत सहभागी आहेत. राज्य व केंद्र सरकारने मागील अनेक वर्ष ओबिसी समाजाची दिशाभूल करून त्यांच्या न्याय्य हक्कांशी खेळ केला आहे. मुख्य प्रश्नावरून ध्यान भरकटवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. सतत दोन समाजात , दोन प्रवर्गात भांडण जुंपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात मोठ्या प्रमाणात ओबिसी समाजातील नागरीकांची पिछेहाट होते आहे. या सर्व मुद्दयावर लक्ष केंद्रीत करून यापुढे एका एका जातींच्या संघटना नाही तर सकल ओबिसी प्रवर्गातील नागरीकांची सामुहीक संघटना मजबुत करण्यासाठी या ओबिसी हक्क मेळाव्यात चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या हक्क सभेत प्रमुख वक्ते बहुजन संघर्ष नागपूरचे नागेश चौधरी , यवतमाळचे विलास काळे , अजयभाऊ भेंडे, प्रा. नूतन माळवी , वैभव काळे औरंगाबाद यांनी आपल्या मार्गदर्शनात ओबिसींची व्याप्ती, जाती-जनगणनेची गरज , ओबिसींचा बॅकलॉग , उच्चवर्णीयांद्वारे होणारे उच्चाटन यावर माहीतीपर मांडणी केली. आज जातींच्या संघटना नाही तर ओबिसी प्रवर्गाची सामुहीक संघटना मजबुत करण्यासाठी आपण यापुढे झटलो पाहीजे असे आवाहन करण्यात आले. वर्तमान सरकार हे लोकशाही व संविधान संपुष्टात आणन्यासाठी प्रयत्न करित आहे.
या ओबिसी हक्क सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत जोडो अभियान चे समन्वयक अविनाश काकडे होते. यावेळी श्रीकांत बारहाते यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेतील न्यायाची भूमिका विषद केली. मनोजभाऊ चांदुरकर यांनी ओबिसी नेत्यांचे उच्चवर्णीय जातीवादी मानसिकतेकडून होणारे उच्चाटन यावर मांडणी केली. सुरेश बोरकर यांनी ओबिसी विद्यार्थ्यांचे होत असलेले उच्चाटण यावर तर शेती प्रश्नावर किरण ठाकरे यांनी विचार मांडले. यावेळी मंचावर समिर देशमुख, सुदाम पवार, स्टीवन रॉबर्ट, मजीद कुरैसी, सलिम कुरेशी, बाळा जगताप, प्रमोद भोमले, सुधिर पांगुळ, मनिष साहु, पुरुषोत्तम खासबागे, द्वारका इमडवार, अनिल अंबुलकर, अनिल रुईकर, बाळा माऊस्कर ,नितेश कराळे, प्रा प्रविण काटकर , नागपूर भारत जोडो च्या संयोजिका प्रा प्रज्वला तट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.




