अक्षरा भटारकर बेस्ट बॉक्सर अवॉर्डने सन्मानित
खासदार क्रीडा महोत्सव
वर्धा : वर्ध्याच्या खासदार क्रीडा महोत्सवात बॉक्सिंग स्पर्धेत मुलींच्या गटात अक्षरा दयानंद भटारकर ही बेस्ट बॉक्सर ठरली आहे. बॉक्सिंगच्या मुलीच्या गटात बेस्ट बॉक्सर म्हणून तिला अवॉर्ड मिळाला असून जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात तिला खासदार रामदास तडस यांच्या हस्ते अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

15 वर्षीय अक्षरा हीने नियमित केलेला सराव आणि खेळाप्रति असलेली जिद्द खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी कामी पडली आहे. भविष्यात देखील सरावाच्या माध्यमातून जिल्हा तसेच राज्य स्तरावर स्पर्धा जिंकण्याचा मानस अक्षराने व्यक्त केला आहे.
वर्ध्यात खासदार व क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. या खासदार क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण समारंभ जिल्हा स्टेडियम वर पार पडला. या क्रीडा महोत्सवात वर्ध्यातील विविध खेळातील उत्साही क्रीडापटूना प्रोत्साहन देण्यात आले आहे. विविध भागातून या क्रीडा महोत्सवात खेळाडूंनी सहभाग नोंदविलाय. व्हॉलीबॉल, कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, योगा, जिम्नॅस्टीक, हॉकी अशी विविध खेळांच्या स्पर्धा गेल्या पाच दिवसात जिल्हा क्रीडा संकुलात रंगल्या होत्या. खासदार क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जिल्हा स्टेडियम वर पार पडला. या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे मुख्य अधिकारी अभ्युदय मेघे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, जीप चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, भाजपचे जयंत कावळे, प्रशांत बोरले यावेळी उपस्थित होते.



