Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, July 29
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » विदर्भ राज्य आघाडीच्या यशात गावकऱ्यांचा सिहाचा वाटा
अपडेट

विदर्भ राज्य आघाडीच्या यशात गावकऱ्यांचा सिहाचा वाटा

breakingvidarbhaBy breakingvidarbhaFebruary 22, 2024Updated:February 22, 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

26 दिवसाच्या उपोषणातून 25 गावांचा प्रश्न सुटला

विदर्भ राज्य आघाडीकडून करण्यात आले उपोषण

विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी दिला होता उपोषणाला पाठिंबा

अखेर रेल्वे प्रशासनाला उपोषण आंदोलनाची घ्यावी लागली दखल

रेल्वे थांब्यासाठी पाच वर्षापासून करण्यात आली विविध आंदोलने

खासदार रामदास तडस यांनी ज्यूस पाजून सोडविले उपोषण

आशिष इझनकर                                                                            वर्धा : वर्ध्याच्या सेलू तालुक्यात येणाऱ्या तुळजापूर (दहेगाव) येथे जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी नागरिक विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला बसले होते. शिक्षणासाठी दहेगाव येथून बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे थांबा अत्यावश्यक असल्याने शाळकरी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येत या आंदोलनात सहभागी झाले. 27 जानेवारी पासून हे उपोषण सुरू करण्यात आले. शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी विदर्भ राज्य आघाडीच्या हाकेला ओ देत पुढाकार घेतला. 26 दिवसाच्या उपोषण आंदोलनानंतर 25 गावांच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. अखेर रामकीशन सिंघमधुपे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या उपोषण आंदोलनाला यश आले आणि तुळजापूर (दहेगाव) येथे इंटरसिटी या गाडीला थांबा मिळाला आहे. मागण्या मान्य झाल्याने खासदार रामदास तडस यांनी भेट देऊन रामकीशन सिंघमधुपे यांना ज्यूस पाजत उपोषण सोडविले आहे. विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी विदर्भ राज्य आंदोलनाच्या पुढाकारासाठी रामकीशन सिंघमधुपे यांचे आभार मानले आहे.

नागपूर – वर्धा रेल्वे लाईनवर सिंदी रेल्वे जवळ तुळजापूर(दहेगाव) हे मोठे गाव आहे. सुमारे 25 छोटीमोठी गावे येथील रेल्वे स्थानकाशी जुळून आहे. दळनवळणाचे प्रमुख साधन येथे रेल्वे हेच आहे. कोरोना काळ आला आणि रेल्वे मंत्रालयाने आणि अधिकाऱ्यांनी येथील रेल्वे थांबा बंद केला होता. केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने येथील नागरिकांनी खासदार रामदास तडस यांना अनेकदा निवेदने दिली. पण फायदा झाला नाही. याशिवाय रेल्वे प्रशासनाला देखील निवेदने देत विनंत्या करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी येथे रेल्वे रोको आंदोलन करून नागरिकांनी मागणीकडे लक्ष वेधले होते. परंतु केवळ आश्वासन देण्यात येत होती, त्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने 27 जानेवारी पासून विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वाखाली तुळजापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे साखळी उपोषण सुरू केले गेले.
इंटरसिटी एक्स्प्रेस, जबलपूर एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस आणि मेल या गाड्या तुळजापूर (दहेगाव) येथे थांबाव्या अशी मागणी करण्यात आली होती. तुळजापूर या गावाच्या सभोवताल 25 गावे आहेत. या सर्व गावातील नागरिक, कामगार, नोकरदार आणि शाळकरी विद्यार्थ्यांना रेल्वे हा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याने राजकारण्यांच्या विरोधाला झुगारून गावकऱ्यांनी या आंदोलनाला भरभरून पाठिंबा दिला. विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामकिशोर सिंघमधुपे याना वेळोवेळी साथ देत अरुण गावंडे, रेखा खेलकर, सतीश इंगळे, अमोल ढाकणे, प्रकाश आतीलकर आदी सहभागी झाले. गावातील शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. विविध सामाजिक संघटनांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
असा झाला पाठपुरावा-
2019 पासून सतत विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामकिशोर रामाजी शिगनधुपे यांनी 25 गावातील विद्यार्थ्यांसाठी मेल व इतर गाड्यांच्या थांबा व इतर मागण्यांसाठी सतत पाच वर्षापासून प्रयत्न करीत राहीले. वेगवेगळे आंदोलन करून रेल्वे प्रशासनाकडे परिसरातील समस्या व अडचणी मांडण्यात आल्या.
27 जानेवारी 2024 पासून बेमुदत साखळी उपोषणाला तुळजापूर रेल्वे स्टेशन समोर सुरवात झाली. जवळपास 26 दिवस बेमुदत साखळी उपोषण चालले. अखेर गोड दिवस उगवला 21 फेब्रुवारी 2024 बुधवार रोजी सर्व मागण्या मान्य झाल्या. यापूर्वी विविध आंदोलनाला 18 फेब्रुवारी 2019 ला सुरुवात केली 18 फेब्रुवारी 2024 ला पाच वर्षे पूर्ण होवुन दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ला पाच वर्षे 3 दिवस झाले.
विदर्भ राज्य आघाडीच्या प्रयत्नाने रोवण्यात आले आणखी काही यशाचे दगड –
मध्यंतरीच्या काळात म्हणजे 2023 ला ऑक्टोबर महिन्यात तुळजापूर रेल्वे परिसरातील 25 गावातील ग्रामस्थासाठी रेल्वे लाईन क्रांसीगवर फुट ओव्हर ब्रीज मंजूर झाला. तसेच रेल्वे पैसेजर साठी उंच प्लाट फार्म मंजूरी मिळाली.
” गावातील विद्यार्थी, कामगार ,रेल्वे कामगार, नोकरदार रेल्वे प्रवास करू शकत नव्हते, एकंदरीत परिस्थिती 25 गावातील लोकांची प्रतिकुल झाली होती. त्यामुळे साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात आला. हे सर्व शक्य झाले आपल्या सर्वांच्या सहकार्यातून”…अशी प्रतिक्रिया रामकीशन सिंघमधुपे यांनी दिली आहे.
येथे इंटर सिटी गाडीला थांबा मंजूर झाला असून जबलपूर एक्सप्रेस, मेमो गाडी साप्ताहिक करण्यासाठी दिल्ली येथे 29 फेब्रुवारी 2024 ला पाच लोकांच्या शिष्ठ मंडळाला सोबत फ्लाईट विमानाने दिल्लीला नेले जाणार आहे. आणि 5 मार्च 2024 पर्यंत तुळजापूर रेल्वे स्टेशनला जबलपूर एक्सप्रेस गाडीचा थांबा निश्चित होईल असे रेल्वे विभागाने लिखित दिले आहे. ऐवढेचं नाही 10 वी 12 परिक्षा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सकाळी पहाटे 6 वाजताची ची बस सुरू करून दिली जाणार आहे.
सर्व गावचे सरपंच, ॲड.अरूण येवले,अरुण गावंडे, गजानन तिडके, आशिष इंझनकर, रमेश साळवे, नथुजी पाटील संदीप वाणी सुनील जयस्वाल,मंगेश काकडे, आशिष घुडे,अजय राजुरकर,वैभव ताकसांडे, तातोबा चहांदे समीर आंबाडोळे, किसान मुडे,राजु चावरे, नितेश लाऊडघरे,नाना कावळे, श्रीराम पाटील कवडुजीखेकडे,नारायन वानखेडे ,
अनिल रूईकार, रमेश देशमुख, भालेराव अडे,दिलीप बेहरे, हरिभाऊ रोकडे घनश्याम अतकरे, गोलु पाटील,धम्मज्योती शंभरकर, प्रशांत नारायणे, अमित तेलंग, विठ्ठल उंरकांदे, राहुल बैस, रोशन आगलावे, अरूण आलोटकर, दादाराव घुडे, भिमराव नगराळे,धनराज घुडे, होमदेव बाभुळकर, चरण कौरती, मंगेश तिजारे, तुकाराम पोहटे, बंडु कांबळे धीरज निस्तानै, दिलीप बेहरे, प्रफुल धाबरडे, प्रमोद घुडे, अशोक टेंभऱे, प्रमोद घुडे , विजय भोमले, प्रभाकर दुरतकर अरूण ऐसनकर, मोरेश्वर ढोले, सुरेश कनेर, पफुल कुंभरे, मनोज बैस,सागर महाबुधे, निलेश बाईलबोडै, आनंद लोहकरे, विवेक लोटे, तुषार घोडेस्वार, नरेश क्षिरसागर आदीनी यात सहकार्य केले आहे.
breakingvidarbha

Post Views: 188
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (999)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (982)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (875)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (832)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (780)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.