विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वर्धा शहर सन-२०२४ चे पदाधिकारी ठरले
अध्यक्षपदी दिनेश थुल , महासचिव पराग धवन तर कोषाध्यक्ष पदी राजेश खडसे यांची अविरोध निवड
महामानवांच्या १३३ व्या जयंतीला उत्साहात साजरे करण्याचा मानस
वर्धा (ब्युरो) : स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान वर्धा येथे दि.२५ फेब्रुवारी २०२४ (रविवार) रोजी सन-२०२३ च्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पंकज लभाने तसेच पदाधिकारी व भीम सैनिकांनी वर्धा शहर सन-२०२४ ची विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ही परंपरेनुसार लोकशाही पद्धतीने गठित करण्याकरीता बैठकीचे आयोजन केले होते. रवी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी सन २०२३ च्या समितीने जमा – खर्चाची मांडणी केली व वर्धा शहर सन- २०२४ च्या १३३ व्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी दिनेश थुल,महासचिव पराग धवन तर कोषाध्यक्ष पदी राजेश खडसे यांची अविरोधपणे निवड केली आहे.



