वर्ध्याच्या पुलगाव येथे अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई
दहा ट्रक जप्त करीत 22 जणांना करण्यात आली अटक
गेल्या सात दिवसात तीन मोठ्या कारवाया
वर्धा : वर्ध्याच्या पुलगाव येथे अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करीत तब्बल 22 जणांना पुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. सालफळ येथील रेती डेपोवर रात्री दरम्यान अवैध रेती भरलेले दहा ट्रक रेती वाहून नेत असताना जप्त करण्यात आले आहे. तर सोबत चार कार आणि एक जेसीबी देखील या मोठ्या कारवाईत पोलिसांना सापडला आहे. रात्रीमध्ये रेती वाहून नेण्यास बंदी असताना अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याने कारवाई करण्यात आली. आय पी एस अधिकारी राहुल चव्हाण यांच्याकडे डी वाय एस पी चा पदभार आहे, चव्हाण यांनी रात्री दोन वाजताच्या दरम्यान पुलगाव पोलीस, वर्धा एस पी पथकाने धाड टाकत अवैध रेती वाहून नेणारे ट्रक जप्त केले, ट्रकच्या मालकांसह चालक असे 22 जणांना अटक करण्यात आली. गेल्या सात दिवसातील ही तिसरी मोठी कारवाई आहेय. सेवाग्राम आणि देवळी येथे देखील रेती भरून असलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.



