Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Tuesday, July 28
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » सिंदी रेल्वे होणार देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’ 
अपडेट

सिंदी रेल्वे होणार देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’ 

breakingvidarbhaBy breakingvidarbhaMarch 14, 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास

सिंदी रेल्वे येथील मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कचे उद्घाटन

रेल्वे टर्मिनल सेवेच्या चाचणीला हिरवी झेंडी

वर्धा : सिंदी रेल्वे हा भौगोलिकदृष्ट्या वर्धा जिल्ह्याचा भाग असला तरी त्याला नागपूरपेक्षा वेगळे मानत नाही. त्यामुळे नागपूरमधील उद्योगांना सिंदी ड्राय पोर्टशी जोडून मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या काळात नागपूर हे देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’ म्हणून नावारुपाला आलेले असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
सिंदी रेल्वे येथे बहुप्रतीक्षित अशा मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कचे  नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सिंदी रेल्वे टर्मिनल सेवेच्या चाचणीलाही त्यांनी हिरवी झेंडी दाखवली. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड  यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार  भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे  अध्यक्ष उन्मेष वाघ,  के. सत्यनाथन आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.  गडकरी यांनी सिंदी येथील ड्रायपोर्टचा शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, ‘आज विदर्भाच्या शेतातील उत्पादन किंवा याठिकाणी तयार होणाऱ्या वस्तुंची बांगलादेशमध्ये निर्यात करायची असेल तर रेल्वेने मुंबईला पाठवून तेथून समुद्रामार्गे श्रीलंका व श्रीलंकेतून बांगलादेशला पाठवावे लागते. आता या लॉजिस्टिक पार्कमधून रेल्वेमार्गे थेट हल्दिया (प.बंगाल) आणि तेथून बांगलादेशला आपला माल निर्यात करता येणार आहे. नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग देखील येथून जवळ आहे. ड्राय पोर्टमुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल. परिणामी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही! निर्यात करणाऱ्या उद्योगांचे क्लस्टर याठिकाणी तयार होणार असल्याचेही ना. श्री. गडकरी म्हणाले. ड्रायपोर्टसाठी एक सल्लागार मंडळ नेमण्याच्या सूचनाही मंत्री महोदयांनी दिल्या. यामध्ये प्रकल्पातील तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती व लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यासही त्यांनी सांगितले. खासदार रामदास तडस म्हणाले की, ‘२०१४ पूर्वी वर्धेमध्ये केवळ १६० किलोमीटर लांबीचे रस्ते होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अवघ्या दहा वर्षांत संपूर्ण चित्र पालटले आणि आता ५६० किलोमीटरने रस्त्यांची लांबी वाढली आहे. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
स्थानिकांना रोजगारात प्राधान्य –
लॉजिस्टिक पार्कमध्ये विदर्भातील उद्योजकांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. ‘बाहेरचे उद्योग याठिकाणी येणारच आहेत. पण विदर्भातील मोठ्या उद्योजकांनीही गुंतवणूक करावी. विशेषतः वर्धा जिल्ह्यातील उद्योजकांनी पुढे येण्याची गरज आहे. याठिकाणी शेतीवर आधारित उद्योगांचाही विस्तार करता येईल. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्यात स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य असेल, असेही नितीन गडकरी म्हणाले.
नागपूर-वर्धा अवघ्या ३५ मिनिटांत –
नागपूर ते वर्धा या रेल्वे मार्गावर चौथ्या लाईनचे काम सुरू झाल्यामुळे तसेच नागपूर ते वर्धा ब्रॉडगेज मेट्रोचा करार झाल्यामुळे नागपूर-वर्धा अंतर केवळ ३५ मिनिटांत कापणे शक्य होईल, असे ना. श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी सिंदी ते सेलडोह या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण आणि चौपदरीकरणासाठी १०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलू असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, असेही  गडकरी म्हणाले.
breakingvidarbha

Post Views: 228
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

By breakingvidarbhaJuly 2, 20260

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव सतत वीज पुरवठा…

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Demo
Top Posts

कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका

July 2, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (998)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (980)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (873)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (831)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (777)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.