Close Menu
breakingvidarbhabreakingvidarbha
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
What's Hot

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram
Breaking News
  • जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी
  • शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी
  • औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
  • अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक
  • युथ फेस्टिवल ठरला वर्ध्यात प्रतिभावंताचा कुंभमेळा
  • राष्ट्र उद्धारासाठी ग्रामउद्धार महत्त्वाचा!
  • अभय योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी वान्मथी सी
  • शेतकऱ्यांनो आता सहा जानेवारी पर्यंत करता येणार सोयाबीन नोंदणी
Facebook X (Twitter) Instagram
breakingvidarbhabreakingvidarbha
Subscribe
Wednesday, June 3
  • Home
  • अर्थ
  • आंतराष्ट्रीय
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • निवडणूक
  • हेडलाईन
  • राजकारण
  • राज्य
    • महाराष्ट्र
  • इतर
    • फोटोगॅलरी
    • थोडक्यात
    • पर्यावरण
    • करिअर
    • न्यूज
    • वेबस्टोरी
    • लाइफस्टाइल
    • व्हायरल
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सिटीझन रिपोर्टर
    • सिनेमा
    • सुपरवूमन
    • हास्यजत्रा
    • अपडेट
    • बातम्या
breakingvidarbhabreakingvidarbha
Home » Homepage » मरणावस्थेत असलेल्या शरीरातील लिव्हर पुरुषाला तर किडनी महिलेला
अपडेट

मरणावस्थेत असलेल्या शरीरातील लिव्हर पुरुषाला तर किडनी महिलेला

breakingvidarbhaBy breakingvidarbhaMarch 17, 2024Updated:March 17, 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
विदर्भात नागपूरच्या बाहेर सावंगीत पहिले लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी
वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयात यशस्वी ठरले प्रत्यारोपण
नागपूरच्या बाहेरील विदर्भातील पहिली लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
नागपूर येथील मृत युवकाचे लिव्हर आणण्यात आले वर्ध्यात
लिव्हर प्रत्यारोपनासाठी उभारला ग्रीन कोरिडॉर
वर्धा  : एकाच वेळी लिव्हर आणि किडणी प्रत्यारोपण करून वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम केला आहेय.  पहिले लिव्हर ट्रान्सप्लांट वर्ध्याच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुगणालयालात यशस्वी ठरले आहे. याच रुग्णालयात आजवर 107 वेळा गरजू रुग्णांना किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष पूर्ण करण्यात आले आहे. विदर्भातले पाहिले लीव्हर प्रत्यारोपण करून सावंगी येथील रुग्णालयाने विक्रम केला आहे. नागपूर येथे उंचावरून खाली पडलेल्या एका 24 वर्षीय रुग्णाचा एम्स रुग्णालयात मरणावस्थेत उपचार सुरू होता. त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. नातेवाईकांच्या संमतीने हे लिव्हर प्रत्यारोपण एका 58 वर्षीय पुरुष रुग्णासाठी करण्यात आले आहेय. तर किडनी ही 36 वर्षीय स्त्री रुग्णाला दान करण्यात आली आहे. येथीलच किडनी प्रत्यारोपण हे 107 वे किडनी प्रत्यारोपण ठरले आहे. त्यामुळे सावंगी रुग्णालयाच्या या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा वर्ध्यात विक्रम झाला आहे.

आजवर सावंगी येथे आई, वडील, बहीण, भाऊ किंवा अपत्य अशा रक्ताच्या नातेवाईकांनी दिलेल्या किडनीदानातून एकूण ९० प्रत्यारोपण करण्यात आले आहे. तर, गेल्या सात वर्षांपासून ब्रेन डेड झालेल्या मरणावस्थेतील रुग्णाद्वारे प्राप्त झालेल्या अवयवदानातून आजपर्यंत १७ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
 सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात प्रथमच एका गरजू रुग्णावर लिव्हर म्हणजे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. यापूर्वी ब्रेन डेड झालेल्या मरणावस्थेतील रुग्णांद्वारे प्राप्त झालेल्या अवयवदानातून १६ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सावंगी रुग्णालयात झाल्या आहेत. मात्र, कॅडेव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांटची या रुग्णालयातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असून विदर्भात नागपूरबाहेर झालेली ही पहिली शस्त्रक्रिया होय.
एकाच शरीरातील लिव्हर पुरुषाला तर किडनी महिलेला – 
नागपूर येथील व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेला राकेश सातपुते (२४ वर्षे) हा तरूण उंचावरून पडल्याने गंभीर जखमी झाला. या अपघातग्रस्त तरुणाला लगेच नजीकच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्याची अवस्था बघता नातेवाईकांनी नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वैद्यकीय उपचारांसाठी भरती केले. या रुग्णालयात त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, रुग्णाचा मेंदू पूर्णपणे मृत झाल्याने वैद्यकीय उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. दि. ११ मार्च रोजी एम्स येथील डाॅक्टरांनी नातेवाईकांना तशी कल्पना दिली. त्यासोबतच राकेशच्या अवयवदानामुळे अन्य गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, याचीही जाणीव कुटुंबातील सदस्यांना करून देण्यात आली. अखेर नातलगांनी पुढाकार घेत अवयवदानास संमती दिली. एम्सच्या पुढाकाराने आणि क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या परवानगीने अवयवदानातून प्राप्त लिव्हर व एक किडनी सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या दोन गरजू रुग्णांकरिता ग्रीन काॅरिडाॅरच्या सहाय्याने पाठविण्यात आली. सावंगी मेघे रुग्णालयात शनिवारी सायंकाळी ७ ते रात्री २ या दरम्यान झेडटीसीसीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली ५८ वर्षीय पुरूष रुग्णावर लिव्हर प्रत्यारोपण तर ३७ वर्षीय स्री रुग्णावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.

लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबईचे डाॅ. रवी मोहनका, डाॅ. प्रशांत राव, डाॅ. विनायक निकम, बधिरीकरण तज्ज्ञ डाॅ. अमेया पंचवाघ, डाॅ. सौरभ कामत, डाॅ. माधवी नायक यांनी पार पाडली. तर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत डॉ. संजय कोलते, डाॅ. अभिजित ढाले, डाॅ. कपिल सेजपाल, डाॅ. ॠतुराज पेडणेकर यांचा सहभाग होता. याशिवाय, रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डाॅ. चंद्रशेखर महाकाळकर, डाॅ. आर.के. शिंदे, डाॅ. संजीव ज्ञानचंदानी, डाॅ. शिवानी क्षीरसागर, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. विवेक चकोले, डाॅ. नीता वर्मा, डाॅ. जुही जाधव, सिस्टर मृणाल बम्बोडे, श्वेता, भारती, मेघा, अर्चना सरोदे, हसीम कोलनाडू, मारिया एन्थनी, परिचारक मुरलीधर सातपुते, लक्ष्मण चापतेकर यांचाही या प्रत्यारोपण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहभाग होता.
अवयव प्रत्यारोपणाची ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, कुलगुरू डाॅ. ललितभूषण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अनुप मरार, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, डाॅ. चंद्रशेखर महाकाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यारोपण समन्वयक डॉ. रुपाली नाईक, प्रशासकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, फरिदा हिरानी, राजेश सव्वालाखे, कर्नल कुलदीप सेहगल, आदित्य भार्गव, अलका बेंजामिन, डाॅ. रणजित, पवन चाफले, प्रज्वल बोंडे, बिपीन मोकल, मंगेश बुधे यांनी विविध पातळ्यांवर महत्त्वाची भूमिका बजावली.
breakingvidarbha

Post Views: 319
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
breakingvidarbha

Related Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025
Leave A Reply Cancel Reply

Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अपडेट

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

By breakingvidarbhaMay 13, 20260

 वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजाती वर्धा : 9 मे या दिवशी असलेल्या ग्लोबल बिग डे…

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी

May 11, 2026

औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत

March 13, 2025

अल्लादिनरुपी जनतेने मागण्यांना आवर घालावा – सोनम वांगचुक

January 20, 2025
Demo
Top Posts

जागतिक दिवस पक्षी गणनेत वर्धा जिल्ह्यात 58 पक्षी प्रजातींच्या नोंदी

May 13, 2026

Rohit Sharma : BCCIने निवड समितीला दिला डच्चू! रोहितची कर्णधार पदावरून होणार हकालपट्टी ?

November 19, 2022

श्रद्धा हत्याकांड: हे 5 साक्षीदार करणार आफताबची पोलखोल; रेंट अ‍ॅग्रीमेंट आणि पाण्याचं बिलही महत्त्वाचा पुरावा

November 19, 2022

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी?

November 19, 2022
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
About Us

आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटना या अनेक अनुभव देणाऱ्या ठरतात,
घटनांमधून जडणघडण होते. या सामाजिक परिणाम घडविणाऱ्या घटनासह रोजगार,समाजकारण आणि
पर्यावरण राखण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबीवर आम्ही ब्रेकिंग विदर्भ या न्यूज पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या भेटीस येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या पसंतीस उतरणारे हे पोर्टल
सामाजिक जाणिव ठेऊन निर्माण केले गेले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि देशात घडणाऱ्या घटना आपल्या
पर्यत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

Facebook X (Twitter) YouTube
Most Viewed Posts
  • ‘तेरवं’ च्या निमित्ताने हरीश इथापे काय बोलणार? (961)
  • काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (953)
  • कृषिकवी रंगनाथ तालवटकर यांच्या कवितेतून पावसाला आर्त हाक… (824)
  • अमर काळे दोन एप्रिललाच का भरणार उमेदवारी अर्ज? (786)
  • वर्ध्यात हद्द..पार कोण? (739)
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.